पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान, आयआयटी, कानपूरच्या दीक्षांत समारंभाला मंगळवारी, 28 डिसेंबर 2021 रोजी संबोधित करतील


पंतप्रधानांच्या भाषणासाठी आयआयटी-कानपूरचे विद्यार्थी, इतर आयआयटी आणि आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांना विचार-कल्पना पाठवण्याचे आवाहन

Posted On: 22 DEC 2021 10:17AM by PIB Mumbai

पंतप्रधानश्री नरेंद्र मोदी मंगळवारी, 28 डिसेंबर 2021 रोजी आयआयटीकानपूरच्या दीक्षांत समारंभाला संबोधित करणार आहेत. श्री मोदींनी आयआयटी-कानपूरइतर आयआयटी आणि जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या भाषणासाठी

विचारांची देवाणघेवाण करण्याचे आवाहन केले आहे.  

आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे;

"मी या महिन्याच्या 28 तारखेला @IITKanpur येथे दीक्षांत समारंभाला संबोधित करण्यासाठी उत्सुक आहे. विज्ञान आणि नवोन्मेषात मूलगामी योगदान दिलेली ही एक विलक्षण संस्था आहे.

मी सर्वांना सूचना-सल्ला यांचे आदानप्रदान करण्यासाठी आमंत्रित करतो."

***

JaideviPS/VinayakG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1784121) Visitor Counter : 202