पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) स्थापना दिनानिमित्त, बीएसएफ जवानांना दिल्या शुभेच्छा

Posted On: 01 DEC 2021 10:13AM by PIB Mumbai

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) स्थापना दिनानिमित्त, बीएसएफ जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले; 

"स्थापना दिनानिमित्त, @BSF_India परिवाराला शुभेच्छा. बीएसएफचा त्यांच्या धैर्य आणि व्यावसायिकतेसाठी सर्वत्र आदर केला जातो. भारताला सुरक्षित राखण्यासाठी हे दल महत्त्वपूर्ण योगदान देते आणि संकट आणि आपत्तीच्या वेळी अनेक मानवतावादी कार्यवाहीमध्ये आघाडीवर असते."

***

 

Jaydevi PS/Vinayak/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1776700) Visitor Counter : 191