पंतप्रधान कार्यालय
लसीकरण व्याप्ती कमी असलेल्या जिल्ह्यांसोबत 3 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान घेणार आढावा बैठक
प्रविष्टि तिथि:
31 OCT 2021 5:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर 2021
जी 20 शिखर परिषद आणि हवामान बदल परिषद 26(COP26) मध्ये सहभागी होऊन देशात परतल्यानंतर लगेचच, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 3 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत.
कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा 50% पेक्षा कमी दिलेल्या आणि दुसरी मात्रा देण्याची व्याप्ती अत्यंत कमी असलेल्या जिल्ह्यांचा या बैठकीत समावेश असेल. झारखंड, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय आणि अन्य राज्यातील कमी लसीकरण व्याप्ती असलेल्या 40 हून अधिक जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधान संवाद साधतील.यावेळी या राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत.
* * *
S.Patil/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1768162)
आगंतुक पटल : 265
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam