पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

यूपीएससी नागरी सेवा परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केलेल्यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 25 SEP 2021 4:42AM by PIB Mumbai

यूपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केलेल्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

एका ट्विटच्या मालिकेत पंतप्रधान म्हणाले;

"यूपीएससी नागरी सेवा परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण झालेल्यांचे अभिनंदन. लोक सेवेतील एक रोमांचक आणि समाधान देणारी कारकीर्द तुमची वाट पाहत आहे.

ज्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे त्यांना आपल्या राष्ट्राच्या प्रवासाच्या महत्त्वपूर्ण कालावधीत प्रमुख प्रशासकीय भूमिका पार पाडावी लागणार आहे.

जे युवा मित्र यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाले नाहीत त्यांना मी सांगू इच्छितो- तुम्ही खूप प्रतिभावान व्यक्ती आहात. तुम्हाला आणखी प्रयत्न करावे लागतील.

त्याच बरोबर भारतात वैविध्यपूर्ण संधी असून त्यांचा शोध घेण्याची गरज आहे. तुम्ही जे काही करायचे ठरवले असेल त्यासाठी शुभेच्छा. "

<

***

ShaileshP/SushmaK/DY


(Release ID: 1757974) Visitor Counter : 228