माहिती आणि प्रसारण मंत्रालय

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून ‘आयकॉनिक वीक’ चा आरंभ करणार


मायक्रोसाइट, ई-बुक्स आणि सांस्कृतिक कार्यक्रम: लोकसहभागाच्या प्रमुख भावनेतून हा उपक्रम सादर होणार

माहितीपटांसह "नये भारत का नया सफर" या कार्यक्रमाचे दूरदर्शन नेटवर्क द्वारे प्रसारण

चित्रपट महोत्सवातून प्रदर्शित करणार देशभक्तीपर/ उत्कृष्ट चित्रपट

युवकांना आकर्षित करण्यासाठी समाज माध्यमांवर संवादात्मक कार्यक्रम, प्रश्नमंजुषा आणि स्पर्धांचे आयोजन

Posted On: 22 AUG 2021 8:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 ऑगस्ट 2021

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय 23 ते 29 ऑगस्ट हा आठवडा "आयकॉनीक  वीक" म्हणून साजरा करणार आहे. या अंतर्गत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी अनेक उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर "लोकसहभाग आणि जनआंदोलन" या संमग्र भावनेतून या उत्सवाचा आरंभ करणार आहेत, ज्यात देशभरातील नागरीक सहभागी होतील. या उपक्रमाचा हेतू नव भारताच्या प्रगतीच्या प्रवासाचे प्रदर्शन करणे आणि स्वातंत्र्य संग्रामातील ‘दुर्लक्षित नायकांसह’ स्वातंत्र्ययोद्ध्यांचे योगदान साजरे करणे हा  आहे, ज्यात देशभर मोठ्या प्रमाणावर  विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहेत.

सांस्कृतिक कार्यक्रम,पथनाट्ये आणि दूरदर्शनवरील कार्यक्रम तसेच डिजिटल/सोशल मीडिया अशा नाविन्यपूर्ण माध्यमांतून पारंपारिक कार्यक्रमांना संपूर्णपणे पोहोचवणे हा या  एकात्मिक उत्सवाचा एक प्रमुख पैलू आहे. आकाशवाणीच्या  दैनंदिन कॅप्सूल "आझादी का सफर, आकाशवाणी के साथ" हे कार्यक्रम तसेच विविध राज्यांच्या माहिती आणि जनसंपर्क संचालनालयाच्या सहकार्याने आणि मंत्रालयाच्या प्रादेशिक कार्यालयांच्या सहकार्याने देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हे उपक्रम  पोहोचवले जातील. आकाशवाणी नेटवर्कद्वारे सुरू करण्यात येणाऱ्या विशेष कार्यक्रमांच्या मालिकेमध्ये 'धरोहर' (स्वातंत्र्यनेत्यांची भाषणे) आणि निशान (75 महत्त्वाची प्रेक्षणीय स्थळे), अपराजिता (महिला नेते) या कार्यक्रमांचा समावेश आहे. दूरदर्शन नेटवर्कवरून दररोज सादर होणाऱ्या "अनसंग हिरोज, फ्रीडम स्ट्रगल या कार्यक्रमांव्यतिरीक्त, नये भारत का नया सफर आणि जर्नी ऑफ न्यू इंडिया याअंतर्गत विभागीय कार्यक्रम प्रसारीत केले जातील, ज्यात राजकारण, डिजिटल इंडिया, विधीमंडळ  सुधारणा इत्यादी विषयांवरील कार्यक्रमांचा समावेश आहे.

सर्वोत्कृष्ट चित्रपटांचे प्रसारण हे आयकॉनिक वीक उत्सवाचे वैशिष्ट्य असेल. डीडी नेटवर्क "नेताजी" राजकीय संस्थांनांचे विलीनीकरण" इत्यादी माहितीपटांची मालिका प्रदर्शित करेल, "राजी" सारखे लोकप्रिय भारतीय चित्रपट देखील प्रसारित केले जातील. राष्ट्रीय चित्रपट विकास  महामंडळ (NFDC) त्यांचा ओटीटी प्लॅटफॉर्म www.cinemasofindia.com वर एक चित्रपट महोत्सव आयोजित करत आहे ज्यामध्ये "आयलंड सिटी", "क्रॉसिंग ब्रिजेस" इत्यादी चित्रपट सादर केले जातील. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि फिल्म डिव्हिजन यांच्याद्वारे, चित्रपट अभ्यासक आणि आस्वादक यांच्यासाठी "टेक्नॉलॉजिकल एडव्हान्समेंट्स इन फिल्म मेकिंग" या विषयावर  एक वेबिनार आयोजित केली जाणार आहे.

हा उत्साह वाढवण्यासाठी, ऑनलाइन चित्रपट महोत्सव उदाहरणार्थ इंडिया@75: व्हॉयेज ऑफ प्रोग्रेस" आणि "इंडिया@75: आयकॉन्स ऑफ इंडिया" या सारख्या  ऑनलाइन चित्रपट महोत्सवांची मालिका अनुक्रमे दिनांक 23 ते 25 ऑगस्ट, 2021 आणि दिनांक  26 ते 28 ऑगस्ट 2021 या दरम्यान आयोजित केली जाईल. चित्रपट महोत्सव संचालनालय(DFF) परराष्ट्र मंत्रालयासोबत भारतातील इतर देशांच्या विविध दूतावासांमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी सहयोग करत आहे. एनएफएआय 23 ते 29 ऑगस्ट, 2021 या कालावधीत एनएफएआयच्या वेबसाईटवर होणाऱ्या क्लासिक सिनेमावरील लाइव्ह व्हर्च्युअल फिल्म पोस्टर प्रदर्शनाद्वारे आस्वादकांना मंत्रमुग्ध करेल.

प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो 50 पेक्षा अधिक प्रकारांचे जसे पथनाट्ये, प्रहसने, जादूचे प्रयोग, कठपुतळी (बोलक्या बाहुल्या), आणि लोककलांचे एकात्मिक प्रसारण करेल आणि देशभरातील आरओबी आउटरीच कार्यक्रमांद्वारे  गीत आणि नाटक विभागांचे 1000 हून अधिक पीआरटी  लोकांपर्यंत पोहोचवेल.  बीओसी देखील  'मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन' वर एक ई-बुक प्रकाशित करेल जे त्यांच्या वेबसाइटवर उपलब्ध असेल आणि वाचकांना भारतभरातील प्रकाशन विभागाच्या ग्रंथालयांमधून संबंधित विषयांवरील माहितीपूर्ण आणि रोचक पुस्तके वाचावयास देखील मिळू शकतील.

मंत्रालयाच्या सामाजिक माध्यममंचावरून, तरुणाई सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संवादात्मक उपक्रम, प्रश्नमंजुषा आणि स्पर्धांचा आनंद घेऊ शकेल, सोबतच स्वातंत्र्यलढा आणि नवभारताच्या निर्मितीची दृकश्राव्य झलक पाहू शकेल.

‘आझादी का अमृत महोत्सव’अंतर्गत 'आयकॉनिक वीक' हा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे आयोजित होत असलेला एक भव्य उत्सव असेल जो स्वातंत्र्यलढ्याची एकात्मिक मूल्ये आणि गौरव यांसह तरुण, नवोन्मेषी भारताच्या प्रतिमेच्या आकांक्षा आणि स्वप्नांच्या अभिसरणाचे चित्र दर्शवेल.

 

S.Thakur/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1748101) Visitor Counter : 311