पंतप्रधान कार्यालय
जगातील पहिली डीएनए आधारित झायडस युनिव्हर्स ची लस ‘झायकोव्ह-डी’ ला मिळालेली मंजूरी, भारतातील वैज्ञानिकांच्या नवोन्मेषी उत्साहाचेच मूर्तिमंत उदाहरण: पंतप्रधान
Posted On:
20 AUG 2021 10:07PM by PIB Mumbai
जगातील पहिल्या डीएनए आधारित लस- ‘झायकोव्ह-डी’ या झायडस युनिव्हर्स लसीला आपत्कालीन वापराची मंजूरी मिळणे, हे भारतातील वैज्ञानिकांच्या नवोन्मेषी उत्साहाचाचे मूर्तिमंत उदाहरण आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.
CDSCO इंडिया इन्फोच्या एका ट्वीट ला प्रतिसाद देतांना पंतप्रधान म्हणाले; “भारत आपल्या संपूर्ण शक्तिनिशी कोविडशी लढा देतो आहे. जगातील पहिली डीएनए आधारित लस "झायकोव्ह- डी’ ला मंजूरी मिळणे, देशातील वैज्ञानिकांच्या नवोन्मेषी प्रयत्न आणि उत्साहाला मिळालेली पावतीच आहे. देशासाठी ही निश्चितच खूप मोठी उपलब्धी आहे.”
***
S.Tupe/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1747852)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam