पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांकडून टोक्यो 2020 मधील सर्वोत्तम प्रदर्शनासाठी भारतीय क्रीडापटूंचे अभिनंदन
प्राथमिक स्तरावर खेळांची लोकप्रियता वाढून प्रतिभावान खेळाडू पुढे येतील यासाठी कार्यरत राहण्याचे आवाहन
नेटकेपणाने खेळांचे आयोजन केल्याबद्दल जपान सरकार आणि नागरिकांचे मानले आभार
प्रविष्टि तिथि:
08 AUG 2021 6:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 ऑगस्ट 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिक स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केल्याबद्दल भारतीय क्रीडापटूंचे अभिनंदन केले आहे. टोक्यो 2020 च्या समारोनिमित्त पंतप्रधान म्हणाले, भारताचे प्रतिनिधीत्व केलेला प्रत्येक क्रीडापटू चॅम्पियन आहे.
ते म्हणाले, भारताने जिंकलेल्या पदकांचा देशाला अभिमान आणि आनंद आहे.
तसेच, प्राथमिक पातळीवर खेळांची लोकप्रियता वाढून प्रतिभावान खेळाडू पुढे येऊन भारताचे प्रतिनिधीत्व करतील यासाठी कार्यरत राहण्याची हीच वेळ आहे.
पंतप्रधानांनी जपान सरकार आणि नागरिकांचे उत्तम आयोजनाबद्दल आभार मानले. सध्याच्या काळात यशस्वी आयोजन करण्यातून दृढतेचा संदेश दिला आहे. तसेच यातून दिसते की खेळांच्या माध्यमातून कसे एकत्र येता येऊ शकते, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांचा ट्वीट संदेश पुढीलप्रमाणे:
S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1743846)
आगंतुक पटल : 345
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam