पंतप्रधान कार्यालय
राज्यसभेत हरदीप पुरी यांनी केलेले भाषण आणि आरोग्यमंत्र्यांनी दिलेले उत्तर पंतप्रधानांनी केले 'शेअर'
Posted On:
20 JUL 2021 9:31PM by PIB Mumbai
राज्यसभेत कोविड-19 विषयी चर्चा सुरु असताना केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी केलेले भाषण, पंतप्रधानांनी समाजमाध्यमावर 'शेअर' केले आहे. "जागतिक पातळीवर थैमान घालणाऱ्या या महामारीशी संबंधित अनेकविध विषय या भाषणात स्पष्ट केले गेले आहेत"- असे पंतप्रधानांनी ट्विटर संदेशात म्हटले आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या प्रदीर्घ आणि सर्वस्पर्शी भाषणाची लिंकदेखील पंतप्रधानांनी ट्विटरच्या माध्यमातून शेअर केली आहे. "या भाषणामध्ये कोविड-19 विषयक अनेक पैलूंचा सखोल विचार करून त्यांची संवेदनशील मांडणी केलेली दिसून येते. आपण सर्वांनी त्यांचे मनोगत आवर्जून ऐकावे असे मला वाटते"- असे पंतप्रधानांनी ट्विटरवर म्हटले आहे.
***
MC/JW/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1737463)
अभ्यागत कक्ष : 241
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam