पंतप्रधान कार्यालय
संसदेत नवीन मंत्र्यांचा परिचय करून देताना पंतप्रधानांच्या निवेदनाचा मजकूर
महिला, दलित, आदिवासी मंत्री मोठ्या संख्येने असणं उत्साह, आनंद आणि अभिमानास्पद बाब : पंतप्रधान
देशातील दलित, महिला, ओबीसी समाजातील व्यक्ती तसेच शेतकऱ्यांची मुले मंत्री होणं काही लोकांच्या पचनी पडत नाही : पंतप्रधान
Posted On:
19 JUL 2021 2:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जुलै 2021
माननीय अध्यक्षजी,
आज सभागृहात उत्साहाचे वातावरण असणार कारण आमच्या महिला खासदार, मोठ्या संख्येने मंत्रीपदांवर रुजू झाल्या आहेत. आज मला खूप आनंद झाला आहे, की आमचे दलित बांधव मोठ्या संख्येने मंत्रीपदावर आरुढ झाले आहेत. आज आपल्या आदिवासी अनुसूचीत जमातीतील सर्व सहकारी मोठ्या संख्येने मंत्री झाले आहेत याबद्दल सर्वांना आनंद झाला असणार, असा मी विचार करत होतो.
आदरणीय अध्यक्षजी,
या वेळी सभागृहात असलेले आपले सहकारी खासदार जे शेतकरी कुटुंबातील आहेत, ग्रामीण भागातून पुढे आले आहेत, सामाजिक-आर्थिकद्रूष्ट्या मागासवर्गीय, ओबीसी समाजातील आहेत, त्यांना मोठ्या संख्येने मंत्रीमंडळात संधी मिळाली आहे, त्यांचा परिचय करून देण्यात आनंद झाला असता, प्रत्येक बाकावरून, ते बाक वाजवून त्यांचा सन्मान करण्यात आला असता. पण कदाचित देशातील दलित मंत्री व्हावेत, देशातील महिला मंत्री व्हाव्यात, देशातील इतर मागासवर्गीय मंत्री व्हावेत, देशातील शेतकऱ्यांची मुले मंत्री व्हावीत, ही गोष्ट काही लोकांना पसंत पडली नसावी आणि म्हणून ते त्यांचा परिचय देखील होऊन देत नाहीत. आणि म्हणूनच, माननीय सभापती महोदय, मंत्रिमंडळातील नवनियुक्त सदस्यांची लोकसभेत ओळख झाली पाहिजे.
S.Tupe/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1736726)
Visitor Counter : 240
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam