पंतप्रधान कार्यालय

राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त उद्या पंतप्रधान डॉक्टरांना संबोधित करणार

Posted On: 30 JUN 2021 3:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 जून 2021

 

राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 1 जुलै 2021 रोजी दुपारी 3 वाजता डॉक्टरांना संबोधित करतील.

ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले, ''कोविड --19 विरोधातील लढ्यात सर्व डॉक्टर करत असलेल्या  प्रयत्नांचा  देशाला  अभिमान आहे.1 जुलै हा राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून साजरा केला जातो. उद्या दुपारी 3 वाजता भारतीय वैद्यकीय संघटना @IMAIndiaOrg च्या वतीने आयोजित कार्यक्रमात डॉक्टर समुदायाला संबोधित करणार''   
 

 

* * *

Jaydevi PS/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1731450) Visitor Counter : 91