आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतात गेल्या 24 तासात 84,332 नवीन रुग्णांची नोंद, 70 दिवसातला नीचांक


भारतातील सक्रीय रुग्णसंख्या 63 दिवसांनंतर 11 लाखांपेक्षा कमी

सलग 30 व्या दिवशी दैनंदिन नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

रुग्ण बरे होण्याचा दर वाढून तो 95.07 टक्के

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 4.39 टक्के, सलग 19 व्या दिवशी ही दर 10 टक्क्यांपेक्षा कमी

Posted On: 12 JUN 2021 2:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जून 2021

भारतात मागील 24 तासात 84,332 इतकी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. देशात आता सलग 5 व्या दिवशी दैनंदिन रुग्णसंख्येची नोंद 1 लाखांपेक्षा कमी झाली आहे. हेकेंद्र आणि राज्ये – केंद्रशासित प्रदेशांच्या सततच्या आणि एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नांचे परिणाम आहेत.

भारतातील सक्रीय रुग्णसंख्येत सातत्याने घसरण होत आहे. सध्या देशातील सक्रीय रुग्णसंख्या 10,80,690 इतकी आहे. सलग बाराव्या दिवशी ती 20 लाखांपेक्षा कमी आहे.

मागील 24 तासांत रुग्णसंख्येत एकूण 40,981 ने घट झाली आणि देशाच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या ती केवळ 3.68 टक्के इतकी आहे.

कोविड संसर्गातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण बरे होत आहेत. देशात सलग 30 व्या दिवशी दैनंदिन नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मागील 24 तासात 1,21,311 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दैनंदिन नव्या रुग्णांच्या तुलनेत 36,979 आणखी रुग्ण गेल्या 24 तासात बरे झाले आहेत.

महामारीच्या प्रारंभापासून कोविड – 19 संसर्ग झालेल्यांपैकी 2,79,11,384 लोक बरे झाले आहेत. तर मागील 24 तासात 1,21,311 रुग्ण बरे झाले. त्यामुळे बरे होणाऱ्यांचा कल वाढता असून बरे होण्याचा एकूण दर 95.07 % वर पोहोचला आहे.

देशात चाचण्यांच्या क्षमतेत सातत्याने वाढ कायम असून गेल्या 24 तासात एकूण 19,20,477 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकूण 37.62 कोटींपेक्षा अधिक (37,62,32,162) चाचण्या करण्यात आल्या.

देशभरात एकीकडे चाचण्यांचे प्रमाण वाढत आहे त्याचवेळी साप्ताहिक पॉझिटिव्हिटीमध्ये घसरणीचा कल कायम आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 4.94 % इतका, तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 4.39% टक्के इतका आहे. सलग 19 व्या दिवशी तो 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे.

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत मागील 24 तासांमध्ये लसीकरणाने 25 कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासात 34,33,763 लसीकरणाच्या मात्रा देण्यात आल्या.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, 34,64,228  सत्रांमध्ये एकूण 24,96,00,304 लसीच्या मात्रा देण्यात आल्या.

HCWs

1st Dose

1,00,35,262

2nd Dose

69,47,565

FLWs

1st Dose

1,66,36,247

2nd Dose

88,12,574

Age Group 18-44 years

1st Dose

3,81,21,531

2nd Dose

5,61,503

Age Group 45 to 60 years

1st Dose

7,47,06,979

2nd Dose

1,18,31,770

Over 60 years

1st Dose

6,21,90,130

2nd Dose

1,97,56,743

Total

24,96,00,304

S.Tupe/S.Shaikh/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1726503) Visitor Counter : 160