PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 22 MAY 2021 7:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली/मुंबई 22 मे 2021

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती

गेल्या 24 तासात  20.66 लाखापेक्षा जास्त चाचण्या करुन भारताने एका दिवसात सर्वाधिक चाचण्या करण्याचा नवा विक्रम पुन्हा एकदा रचला आहे. सलग चार दिवस दररोज 20 लाखांपेक्षा जास्त चाचण्याही करण्यात आल्या आहेत.

दैनंदिन पॉझीटीव्हिटी दरात 12.45% पर्यंत घट झाली आहे.

देशात गेल्या 24 तासात एकूण, 20,66,285 चाचण्या करण्यात आल्या.

देशात सलग 9 व्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. गेल्या 24 तासात 3,57,630 कोरोनामुक्तांची नोंद झाली आहे.

बरे झालेल्यांची एकूण संख्या आज 2,30,70,365 झाली. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर वाढून 87.76% झाला आहे.

नुकत्याच बरे झालेल्यांपैकी 73.46% जण दहा राज्यातले आहेत.

देशात सलग सहाव्या दिवशी 3 लाखांपेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत ही आणखी एक सकारात्मक घडामोड आहे.

गेल्या 24 तासात 2,57,299 नव्या रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात आढळलेल्या नव्या रुग्णांपैकी 78.12% रुग्ण दहा राज्यातले आहेत. तामिळनाडूत सर्वाधिक 36,184, त्या पाठोपाठ कर्नाटकात 32,218 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली.

दरम्यान, भारतातील एकूण सक्रीय रुग्णसंख्येत घट होत ती आज 29,23,400 वर पोहचली.

गेल्या 24 तासात एकूण घट 1,04,525 इतकी नोंदवण्यात आली.

देशातील एकूण सक्रीय रुग्णांपैकी ही संख्या 11.12% आहे.

देशातील एकूण सक्रीय रुग्णांपैकी 69.94% रुग्ण आठ राज्यातील आहेत.

देशव्यापी लसीकरण मोहीमेच्या तिसऱ्या टप्प्यात कोविड19 लसीच्या एकूण 19.33 कोटी मात्रा आतापर्यंत देण्यात आल्या आहेत.

हाती आलेल्या अहवालानुसार आज सकाळी सात वाजेपर्यंत, एकूण 19,33,72,819 लसीच्या मात्रा 27,76,936 सत्रांमध्ये देण्यात आल्या.

यात आरोग्य क्षेत्रातल्या 97,38,148 कर्मचाऱ्यांना पहिली तर 66,91,350 कर्मचाऱ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. आघाडीवर कार्यरत 1,48,70,081 कर्मचाऱ्यांना पहिली तर 83,06,020 कर्मचाऱ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. 18 ते 44 वयोगटातील 92,97,532 लाभार्थ्यांना पहिली मात्रा दिली आहे. 45 ते 60 वयोगटातील 6,02,11,957 लाभार्थ्यांना पहिली तर 96,84,295 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. 60 वर्षांवरील 5,63,83,760 लाभार्थ्यांना पहिली तर 1,81,89,676 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा दिली आहे.

देशभरात आतापर्यंत झालेल्या एकूण लसीकरणापैकी  66.30% मात्रा दहा राज्यात दिल्या आहेत.

इतर अपडेट्स :

  • देशभरात व्यापक लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून, भारत सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड लसींच्या मात्रा विनामूल्य पुरवित आहे. याव्यतिरिक्त, भारत सरकार राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसाठी लसींच्या मात्रांची थेट खरेदी करणे, हे देखील सुलभ करत आहे. या महामारीचे नियंत्रण आणि व्यवस्थापन यासाठी चाचण्या, रुग्णाच्या संपर्कातल्या व्यक्तींचा शोध, उपचार आणि कोविडला प्रतिबंध करणारी वर्तणूक याबरोबरच लसीकरण हा या महामारी विरोधातल्या भारत सरकारच्या पंच सूत्री धोरणाचा अविभाज्य भाग आहे.
  • भारत सरकारला 27 एप्रिल 2021 पासून कोविड -19  मदत वैद्यकीय सामग्री पुरवठा आणि उपकरणे यांचे आंतरराष्ट्रीय सहकार्य विविध देशांकडून/संस्थांकडून प्राप्त होत आहे. कोविड-19 व्यवस्थापनासाठी होत असलेल्या प्रयत्नांना पूरक म्हणून ही मदत सामग्री राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना त्वरेने वितरीत/रवाना करण्यात येत आहेत.
  • विविध राज्यांमध्ये म्युकरमायकोसिसच्या वाढत्या रुग्णसंख्येचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर अ‍ॅम्फोटेरिसिन बी औषधाच्या एकूण 23680 अतिरिक्त कुप्या आज सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना वितरित करण्यात आल्या आहेत असे केंद्रीय रसायन व खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी जाहीर केले आहे.
  • सर्व अडथळे पार करत आणि समस्यांवर उत्तर शोधत, भारतीय रेल्वे देशातल्या विविध राज्यांत द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा करत आहे. आतापर्यंत, रेल्वेने 884 टँकर्सच्या माध्यमातून 224 ऑक्सिजन एक्स्प्रेसद्वारे 14500 मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे.
  • बारावीच्या परीक्षा आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा घेण्यासंदर्भातील प्रस्तावांवर चर्चा करण्यासाठी सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव आणि राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष आणि भागधारक यांच्यासोबत उद्या एक उच्चस्तरीय आभासी बैठकीचे आयोजन केले आहे.
  • सध्या सुरू असलेल्या कोविड-19 महामारीच्या काळात देशातील विविध भागात द्रवरूप ऑक्सिजनच्या (एलओएक्स) जलद आणि सुरळीत वाहतुकीवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले आहे. यासंदर्भात, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की सध्याच्या नियमांनुसार आणि सीएमव्हीआर, 1989 च्या अनुषंगाने पुरेसे प्रशिक्षण असलेले आणि धोकादायक मालवाहतुकीचा परवाना असलेल्याच प्रशिक्षित चालकांना द्रवरूप ऑक्सिजनचे ट्र्क चालविण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे 24x7 मागणी लक्षात घेऊन विद्यमान चालकांना पूरक/त्यांच्या जागी नवीन चालकांना सामावून घेण्यासाठी तातडीने मोठ्या संख्येने प्रशिक्षित चालक तयार करण्याची आवश्यकता आहे.
  • कोविड-19 महामारीचा सामना करण्याच्या लढाईत आवश्यक ठरलेले ऑक्सिजन काँसंट्रेटर्स भारतातच विकसित केले जाण्यास प्रोत्साहन मिळावे, या दृष्टीने ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाअंतर्गत, त्यातील महत्वाचे घटक आणि ऑक्सिजन काँसंट्रेटर्समध्ये नवनव्या संशोधनांसाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला असून, अशी संशोधने पाठवण्याचे आवाहनही केले आहे.
  • बंगळुरूस्थित एका स्टार्ट अप ने एक अनोखी, पॉईंट ऑफ केअर इलेक्ट्रोकेमिकल अर्थात विद्युत रासायनिक एलिसा चाचणी विकसित केली असून ही चाचणी वैद्यकीय नमुन्यांमधून कोविड 19 च्या एकूण केंद्रीकरण झालेल्या अँटिबॉडीजच्या जलद आणि अचूक अंदाजासाठी सहाय्यकारी ठरते.

महाराष्ट्र अपडेट्स :-

राज्यातील ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मिशन ऑक्सिजन स्वावलंबनयोजना सुरू केली आहे. या योजनेतंर्गत ऑक्सिजन उत्पादन  करणाऱ्या उद्योगांना विशेष प्रोत्साहने दिली जाणार आहेत. सध्या राज्यातील ऑक्सिजन निर्मितीची क्षमता दिवसाला 1300 मे.टन आहे. ऑक्सिजनची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी दररोज राज्यात 3000 मे.टन ऑक्सिजन उत्पादनाचे उद्दीष्ट ठेवून राज्य सरकारने काही प्रोत्साहने जाहीर  केली आहेत.  30 जूनपूर्वी अर्ज करणाऱ्यांनाच या धोरणाचा लाभ मिळेल.

गोवा अपडेट्‌स:-

काळ्या बुरशीच्या आजारावर उपचार करण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी गोवा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 20 खाटांच्या एका समर्पित वॉर्डची घोषणा केली.60 खाटा  असलेल्या बालकांसाठीच्या अतिदक्षता विभागात आणि आणि वैद्यकीय अतिदक्षता विभागातील सुविधा वाढविण्यात आल्या आहेत. कोविड-19 च्या अपेक्षित तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने  व्यवस्थापनाच्या  दृष्टीने तज्ञ समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या सचिवपदी डॉ. जगदीश काकोडकर, अध्यक्षपदी  डॉ. शिवानंद बांदेकर, उपाध्यक्षपदी डॉ. जोस डी’सा आणि अन्य पाच सदस्यांचा समावेश असेल.

Jaydevi PS/P.Malandkar



(Release ID: 1720946) Visitor Counter : 181


Read this release in: English , Hindi , Punjabi , Gujarati