आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड मदतीसंदर्भात अद्ययावत माहिती
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत 16,530 ऑक्सिजन काँसंट्रेटर्स, 15,901 ऑक्सिजन सिलिंडर्स, 19 ऑक्सिजन निर्मिती संयंत्र, 11,416 व्हेंटीलेटर्स/बायपॅप, रेमडेसीव्हीर इंजेक्शनच्या सुमारे 6.6 लाख कुप्या त्वरेने वितरीत/रवाना करण्यात आल्या
प्रविष्टि तिथि:
22 MAY 2021 5:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 मे 2021
भारत सरकारला 27 एप्रिल 2021 पासून कोविड -19 मदत वैद्यकीय सामग्री पुरवठा आणि उपकरणे यांचे आंतरराष्ट्रीय सहकार्य विविध देशांकडून/संस्थांकडून प्राप्त होत आहे. कोविड-19 व्यवस्थापनासाठी होत असलेल्या प्रयत्नांना पूरक म्हणून ही मदत सामग्री राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना त्वरेने वितरीत/रवाना करण्यात येत आहेत.
27 एप्रिल 2021 पासून 21 मे, 2021पर्यंत रस्ते आणि हवाई मार्गाद्वारे एकूण 16,530 ऑक्सिजन काँसंट्रेटर्स, 15,901 ऑक्सिजन सिलिंडर्स, 19 ऑक्सिजन निर्मिती संयंत्र, 11,416 व्हेंटीलेटर्स/ बायपॅप, रेमडेसीव्हीर इंजेक्शनच्या सुमारे 6.6 लाख कुप्या वितरीत/रवाना करण्यात आल्या.
20/21 मे 2021 रोजी कतार, वेल्स सरकार (यूके), कॅनडा सरकार, सस्काचेवान सरकार (कॅनडा), यूएसआयएसपीएफ, रॉबर्ट बॉश (जर्मनी) यांच्याकडून प्राप्त झालेल्या मोठ्या वस्तूंचा समावेश आहे:
|
Consignments
|
Quantity
|
|
Oxygen Concentrators
|
963
|
|
Ventilators/Bi-PAP/CPAP
|
465
|
याव्यतिरिक्त, फेस शिल्ड्स, मास्क आणि इतर वैयक्तिक संरक्षण उपकरणे प्राप्त झाली.
राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि संस्थांना प्रभावी त्वरित वाटप आणि सुव्यवस्थित वितरण अविरत सुरूच आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालय नियमितपणे यावर व्यापक देखरेख ठेवून आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्य म्हणून अनुदान, मदत आणि देणगी स्वरूपात प्राप्त परदेशी कोविड मदत सामग्री प्राप्त झाल्यानंतर वाटपाच्या दृष्टीने समन्वय साधण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयात एक समर्पित समन्वय कक्ष तयार करण्यात आला आहे. हा कक्ष 26 एप्रिल, 2021 पासून कार्यरत आहे. आरोग्य मंत्रालयाने 2 मे, 2021 पासून प्रमाणित कार्यान्वयन प्रक्रिया तयार केली आणि अंमलात आणली.
S.Tupe/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1720909)
आगंतुक पटल : 338