रेल्वे मंत्रालय

रेल्वेच्या ऑक्सिजन एक्स्प्रेस ने मिशन मोडवर प्रवास करत, 884 टँकर्सच्या माध्यमातून 224 ऑक्सिजन एक्स्प्रेसने 14500 मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनचा केला पुरवठा


सध्या 35 टँकर्सच्या माध्यमातून 563 मेट्रिक टन ऑक्सिजन घेऊन आठ ऑक्सिजन एक्सप्रेसचा प्रवास सुरु

उत्तराखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, हरियाणा, तेलंगणा, पंजाब, केरळ आणि उत्तरप्रदेश अशा 13 राज्यांना ऑक्सिजन पुरवठ्यातून दिलासा

आतापर्यंत महाराष्ट्रात 614 मेट्रिक टन, उत्तरप्रदेशात सुमारे 3463, मध्यप्रदेशात 566, दिल्लीत 4278 मेट्रिक टन, हरियाणात 1698, आंध्रप्रदेशात 571, राजस्थानात 98, तामिळनाडूत 769, तेलंगणाला 772 मेट्रिक टन, पंजाबला 153 मेट्रिक टन, केरळला 246 मेट्रिक टन, उत्तराखंडला 320 मेट्रिक टन, कर्नाटकला 943, मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा

Posted On: 22 MAY 2021 5:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 मे 2021

सर्व अडथळे पार करत आणि समस्यांवर उत्तर शोधत, भारतीय रेल्वे देशातल्या विविध राज्यांत द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा करत आहे. आतापर्यंत, रेल्वेने 884 टँकर्सच्या माध्यमातून 224 ऑक्सिजन एक्स्प्रेसद्वारे 14500 मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे.

आज दुपारपर्यंत, सध्या 35 टँकर्सच्या माध्यमातून 563 मेट्रिक टन ऑक्सिजन घेऊन आठ ऑक्सिजन एक्सप्रेसचा प्रवास सुरु होता.

सध्या ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून, देशभरात दररोज सरासरी 800 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. ऑक्सिजन पुरवठ्याची विनंती करणाऱ्या सर्व राज्यांना लवकरात लवकर अधिकाधिक ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे रेल्वेचे प्रयत्न आहेत.

आतापर्यंत, महाराष्ट्रासह उत्तराखंड, कर्नाटक, मध्यप्रदेश आंध्रप्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, हरियाणा, तेलंगणा, पंजाब, केरळ आणि उत्तरप्रदेश अशा 13 राज्यांना ऑक्सिजन पुरवठ्यातून दिलासा देण्याचा प्रयत्न रेल्वेने केला आहे.

आज दुपारपर्यंत महाराष्ट्रात 614 मेट्रिक टन, उत्तरप्रदेशात सुमारे 3463, मध्यप्रदेशात 566, दिल्लीत 4278 मेट्रिक टन, हरियाणात 1698, आंध्रप्रदेशात 571, राजस्थानात 98 , तामिळनाडूत 769, तेलंगणाला 772 मेट्रिक टन, पंजाबला 153, केरळला 246 मेट्रिक टन, उत्तराखंडला 320, कर्नाटकला 943 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला आहे.

ऑक्सिजन पुरवठा केंद्रांपासून ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी रेल्वेने विविध मार्ग सुनिश्चित केले आहेत. त्यानुसार, कोणत्याही राज्यात, ऑक्सिजनची गरज निर्माण झाल्यास रेल्वे तत्परतेने पुरवठा सेवा देऊ शकते. द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी राज्यांकडून रेल्वेला टँकर्सचा पुरवठा केला जातो.

रेल्वेने 24 एप्रिलपासून ऑक्सिजन एक्सप्रेसचा प्रवास सुरु असून पहिल्यांदा महाराष्ट्राला 126 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला.

देशाच्या कानाकोपऱ्यात पोचत रेल्वे, पूर्वेकडे हापा, बडोदा, राऊरकेला, दुर्गापूर, टाटानगर, अंगुल इथून ऑक्सिजन घेऊन येत आहे आणि नंतर, उत्तराखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान तामिळनाडू, हरियाणा, तेलंगणा, पंजाब, केरळ, दिल्ली आणि उत्तरप्रदेश अशा विविध दिशांना असलेल्या राज्यांना  या ऑक्सिजनचा पुरवठा करत आहे.

ऑक्सिजनचा पुरवठा जलद केला जावा, या दृष्टीने नियोजन करत, रेल्वेने ऑक्सिजन एक्सप्रेस मालवाहतुकीचे नवे परिमाण आणि मानक स्थापित केले आहेत. या सर्व महत्वाच्या मालवाहतूक मार्गांचा सरासरी वेग ताशी 55 किमी इतका असतो. मात्र आता ऑक्सिजन एक्सप्रेससाठी खास ग्रीन कॉरिडॉर तयार करत, लवकरात लवकर ऑक्सिजन एक्सप्रेस आपल्या निश्चित स्थळी पोचतील याची व्यवस्था विविध क्षेत्रांमधल्या कार्यरत चमूंनी एकत्रितपणे केली. जेणेकरुन ऑक्सिजनचा पुरवठा सगळीकडे वेळेत होऊ शकला. तांत्रिक कारणामुळे घ्यावे लागणारे थांबे केवळ एक मिनिट, रेल्वे कर्मचाऱ्यांची ड्युटी बदलण्याच्या वेळेपुरते घेण्यात येत आहेत.

सर्व मार्ग मोकळे ठेवण्यात येत असून त्यावरुन केवळ ऑक्सिजन एक्सप्रेसची वाहतूक केली जात आहे.

या सर्व उपाययोजना करतांना, इतर मालवाहतुकीचा वेग कमी होणार नाही, याचीही दक्षता घेतली जात आहे.

या नव्या ऑक्सिजनची वाहतूक करणे ही अत्यंत गतिमान प्रक्रिया असून, त्याची आकडेवारी सातत्याने बदलत असते. आज रात्री आणखी काही ऑक्सिजन एक्सप्रेस आपला प्रवास सुरु करण्याची अपेक्षा आहे.

 

S.Tupe/R.Aghor/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1720911) Visitor Counter : 204