आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

गेल्या 24 तासात भारताने सर्वोच्च 20.66 लाख चाचण्या करत केला आणखी एक विक्रम

सलग चोथ्या दिवशी दररोज 20 लाखांपेक्षा जास्त चाचण्या करण्यात आल्या

दैनंदिन पॉझीटीव्हिटी दरात 12.45% पर्यंत घट

सलग नवव्या दिवशी दैनंदिन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त

सलग सहाव्या दिवशी दैनंदिन नव्या रुग्णांची संख्या 3 लाखांपेक्षा कमी

Posted On: 22 MAY 2021 11:40AM by PIB Mumbai

गेल्या 24 तासात 20.66 लाखापेक्षा जास्त चाचण्या करुन भारताने एका दिवसात सर्वाधिक चाचण्या करण्याचा नवा विक्रम पुन्हा एकदा रचला आहे. सलग चार दिवस दररोज 20 लाखांपेक्षा जास्त चाचण्याही करण्यात आल्या आहेत.

दैनंदिन पॉझीटीव्हिटी दरात 12.45% पर्यंत घट झाली आहे.

देशात गेल्या 24 तासात एकूण, 20,66,285 चाचण्या करण्यात आल्या.

देशात सलग 9 व्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. गेल्या 24 तासात 3,57,630 कोरोनामुक्तांची नोंद झाली आहे.

बरे झालेल्यांची एकूण संख्या आज 2,30,70,365 झाली. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर वाढून 87.76% झाला आहे.

नुकत्याच बरे झालेल्यांपैकी 73.46% जण दहा राज्यातले आहेत.

देशात सलग सहाव्या दिवशी 3 लाखांपेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत ही आणखी एक सकारात्मक घडामोड आहे.

गेल्या 24 तासात 2,57,299 नव्या रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात आढळलेल्या नव्या रुग्णांपैकी 78.12% रुग्ण दहा राज्यातले आहेत. तामिळनाडूत सर्वाधिक 36,184, त्या पाठोपाठ कर्नाटकात 32,218 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली.

दरम्यान, भारतातील एकूण सक्रीय रुग्णसंख्येत घट होत ती आज 29,23,400 वर पोहचली.

गेल्या 24 तासात एकूण घट 1,04,525 इतकी नोंदवण्यात आली.

देशातील एकूण सक्रीय रुग्णांपैकी ही संख्या 11.12% आहे.

देशातील एकूण सक्रीय रुग्णांपैकी 69.94% रुग्ण आठ राज्यातील आहेत.

गेल्या 24 तासात सक्रीय रुग्णसंख्येत झालेला राज्यवार बदल खालील आलेखात अधोरेखित केला आहे.

देशव्यापी लसीकरण मोहीमेच्या तिसऱ्या टप्प्यात कोविड19 लसीच्या एकूण 19.33 कोटी मात्रा आतापर्यंत देण्यात आल्या आहेत.

हाती आलेल्या अहवालानुसार आज सकाळी सात वाजेपर्यंत, एकूण 19,33,72,819 लसीच्या मात्रा 27,76,936 सत्रांमध्ये देण्यात आल्या.

यात आरोग्य क्षेत्रातल्या 97,38,148 कर्मचाऱ्यांना पहिली तर 66,91,350 कर्मचाऱ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. आघाडीवर कार्यरत 1,48,70,081 कर्मचाऱ्यांना पहिली तर 83,06,020 कर्मचाऱ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. 18 ते 44 वयोगटातील 92,97,532 लाभार्थ्यांना पहिली मात्रा दिली आहे. 45 ते 60 वयोगटातील 6,02,11,957 लाभार्थ्यांना पहिली तर 96,84,295 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. 60 वर्षांवरील 5,63,83,760 लाभार्थ्यांना पहिली तर 1,81,89,676 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा दिली आहे.

देशभरात आतापर्यंत झालेल्या एकूण लसीकरणापैकी 66.30% मात्रा दहा राज्यात दिल्या आहेत.

 

***

ST/VG/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1720842) Visitor Counter : 110