आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

21 कोटींपेक्षा अधिक लसींच्या मात्रा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना पुरवण्यात आल्या

राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे अद्यापही 1 कोटी 60 लाखांपेक्षा अधिक मात्रा उपलब्ध

Posted On: 22 MAY 2021 11:15AM by PIB Mumbai

देशभरात व्यापक लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून, भारत सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड लसींच्या मात्रा विनामूल्य पुरवित आहे. याव्यतिरिक्त, भारत सरकार राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसाठी लसींच्या मात्रांची थेट खरेदी करणे, हे देखील सुलभ करत आहे. या महामारीचे नियंत्रण आणि व्यवस्थापन यासाठी चाचण्या, रुग्णाच्या संपर्कातल्या व्यक्तींचा शोध, उपचार आणि कोविडला प्रतिबंध करणारी वर्तणूक याबरोबरच लसीकरण हा या महामारी विरोधातल्या भारत सरकारच्या पंच सूत्री धोरणाचा अविभाज्य भाग आहे.

कोविड -19 लसीकरणाच्या व्यापक आणि गतीशील अशा तिसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी दिनांक 1 मे 2021 पासून सुरू झाली आहे.

या धोरणा अंतर्गत एकूण उत्पादित लसींपैकी केंद्रीय औषध प्राधिकरणाने मान्यता दिलेल्या (सीडीएल) लसींच्या मात्रांपैकी 50% मात्रा प्रत्येक महिन्यात सरकारकडून खरेदी केल्या जातील. भारत सरकार पूर्वीप्रमाणे हे डोस पूर्णपणे विनामूल्य राज्य सरकारांना उपलब्ध करुन देत राहील.

भारत सरकारने आतापर्यंत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना 21 कोटींपेक्षा जास्त लसींच्या मात्रा ( 21,33,74,720) मोफत आणि थेट खरेदी या दोन्ही माध्यमातून उपलब्ध केल्या आहेत.

आज सकाळी 8 वाजेपर्यंत उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, यापैकी वाया गेलेल्या मात्रा धरून 19,73,61,311 लसींच्या मात्रा वापरण्यात आल्या.

1.60 कोटींपेक्षा अधिक कोविड लसींच्या मात्रा (1,60,13,409) अद्याप राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे उपलब्ध आहेत.

याव्यतिरिक्त, 2 लाख 67 हजार (2,67,110) पेक्षा जास्त लसींच्या मात्रा लवकरच, वितरीत करण्यात येत असून आहेत आणि पुढील 3 दिवसांत त्या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना प्राप्त होतील.

****

ST/SP/DY

एचएफडब्ल्यू / कोविड लसींचे  राज्यांतील वितरण/ 22  मे 2021/2 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com



(Release ID: 1720839) Visitor Counter : 87