आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

सलग सहाव्या दिवशी दैनंदिन बरे होणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या दैनंदिन नवीन रुग्णांपेक्षा जास्त


सलग तिसऱ्या दिवशी दैनंदिन नवीन रूग्णांची‌ संख्या 3 लाखांपेक्षा कमी

गेल्या 24 तासांत आतापर्यंत सर्वाधिक 20 लाख चाचण्या पूर्ण करण्याचा जागतिक विक्रम

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर घसरून 13.31% वर

आतापर्यंत 18 ते 44 वयोगटातील 64 लाखांहून अधिक लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण

Posted On: 19 MAY 2021 4:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 मे 2021

 

भारतात सलग सहाव्या दिवशी, दैनंदिन बरे होणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या दैनंदिन नवीन रुग्णांपेक्षा अधिक झाली असून गेल्या 24 तासांत 3,89,851 रुग्ण बरे झाले.

भारतात कोविडमुक्त झालेल्याची एकूण  संख्या आज 2,19,86,363 वर पोहोचली आहे. बरे होण्याचा राष्ट्रीय दर 86.23% पर्यंत पोहोचला आहे.

नवीन बरे झालेल्या रुग्णांपैकी 74.94% दहा राज्यातील आहेत.

भारतात सलग तिसऱ्या दिवशी 3 लाखांपेक्षा कमी नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या 24 तासांत 2,67,334 नवीन रुणांची नोंद झाली.

गेल्या 24 तासांत नोंद झालेल्या रुग्णांपैकी 74.46% रुग्ण दहा राज्यांमधील आहेत. तमिळनाडूमध्ये सर्वाधिक नवीन 33,059,रुग्ण आढळले आहेत, त्याखालोखाल केरळमध्ये 31,337 नवीन रूग्ण आढळले आहेत.

गेल्या 24 तासांत त्यात 1,27,046 ने घट झाली आहे.

आता देशातील एकूण पॉझिटिव्ह रूणांपैकी 12.66% रूग्ण सक्रीय आहेत.

देशाच्या एकूण सक्रिय रुणांपैकी 69.02% रुग्ण 8 राज्यातील आहेत.

खाली आलेख गेल्या एक महिन्यातील सक्रिय रूग्णसंख्या दर्शवत आहे.

गेल्या 24 तासांत 20 लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या (ही भारतातील एका दिवसात आतापर्यंत सर्वात जास्त चाचण्या झालेली संख्या आहे), तर दैनंदिन पॉसिटिव्हिटी दर घसरून 13.31% वर आला आहे.

गेल्या 24 तासात देशात 20.08 लाख चाचण्या घेण्यात आल्या असून हा जागतिक विक्रम आहे.

आतापर्यंत देशभरात 32 कोटीहून अधिक चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

खालील आलेख भारतात घेण्यात आलेल्या चाचण्यांचा चढता कल दर्शवित आहे. एकत्रित पॉसिटिव्हिटी दर 7.96% आहे.

देशभरातील लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत  देशातील कोविड -19 लसींच्या एकूण मात्रांची संख्या आज 18.58 कोटींवर पोहोचली आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण 18,58,09,302 लसींच्या मात्रा 27,10,934 सत्रांद्वारे देण्यात आल्या आहेत. यामध्ये 96,73,684 आरोग्य कर्मचारी (पहिली मात्रा), 66,59,125 एचसीडब्ल्यू (दुसरी मात्रा), 1,45,69,669 आघाडीवर काम करणारे कर्मचारी (पहिली मात्रा), 82,36,515 आघाडीवर काम करणारे कर्मचारी (दुसरी मात्रा ),18-44 वयोगटातील 64,77,443 लाभार्थी (पहिली मात्रा),45 ते 60 वयोगटातील 5,80,46,339 (पहिली मात्रा) आणि 93,51,036 (दुसरी मात्रा ) तर 45 ते 60 वर्षे वयोगटातील 5,48,16,767 पहिली मात्रा तर, 79,78,724 लाभार्थींना लसीची दुसरी मात्रा देण्यात आला.

HCWs

1st Dose

96,73,684

2nd Dose

66,59,125

FLWs

1st Dose

1,45,69,669

2nd Dose

82,36,515

Age Group 18-44 years

1st Dose

64,77,443

Age Group 45 to 60 years

1st Dose

5,80,46,339

2nd Dose

93,51,036

Over 60 years

1st Dose

5,48,16,767

2nd Dose

1,79,78,724

 

Total

18,58,09,302

 

S.Tupe/S.Patgaonkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1719916) Visitor Counter : 237