आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
                
                
                
                
                
                
                    
                    
                        देशात पहिल्यांदाच बरे झालेल्या रुग्णांची दैनंदिन संख्या चार लाखांहून अधिक
                    
                    
                        
सलग दुसऱ्या दिवशी नव्या रुग्णांची संख्या तीन लाखांहून  कमी
गेल्या 24 तासांत सक्रिय रुग्णांच्या संख्येत 1,63,232 ची घट
भारतातील एकूण लसीकरणाची संख्या 18.44 कोटी पेक्षा अधिक
18 ते 44 या वयोगटातील 66 लाख लाभार्थ्यांचे आतापर्यंत लसीकरण
                    
                
                
                    Posted On:
                18 MAY 2021 3:27PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                 
सर्व आरोग्य कर्मचारी आणि पहिल्या फळीत काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांच्या समर्पित आणि अथक परिश्रमांतून लक्षणीय यश मिळवत भारतात आज पहिल्यांदाच कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांची दैनंदिन संख्या,चार लाखांपेक्षा अधिक नोंदली गेली आहे.
गेल्या 24 तासांत देशात 4,22,436 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.  
गेल्या 14 दिवसातली रुग्ण बरे होण्याचीसरासरी संख्या 3,55,944 इतकी नोंदवण्यात आली आहे. खाली दिलेल्या आलेखात, गेल्या 14 दिवसातील बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण दर्शवले आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात, 2,63,533 नव्या रुग्णांची नोंद झाली.  
देशभरात नव्याने आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या आज सलग दुसऱ्या दिवशी तीन लाखांपेक्षा कमी आहे. गेल्या 24 तासांत कोरोना रुग्णांच्या संख्येत,1,63,232 इतकी घट नोंदवण्यात आली आहे.  
13 मार्च पासून, भारतातील कोरोना रुग्ण आणि बरे झालेल्या रुग्णांची संख्या आणि प्रमाण खालील नकाशात आपल्याला बघायला मिळते.

भारतात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आज 2,15,96,512  पर्यंत पोचली. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 85.60% टक्क्यांपर्यंत पोचला आहे.
नव्या रूग्णांपैकी 75.77%  रुग्ण दहा राज्यातले आहेत.  

तर दुसरीकडे, सक्रीय रुग्णांची संख्या 33,53,765 पर्यंत कमी झाली आहे. यानुसार, देशातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांपैकी सक्रीय रुग्णांचे प्रमाण 13.29% इतके आहे.
आठ राज्यांमध्ये सक्रीय रुग्णांची संख्या 69.01% इतकी आहे.

भारतात तिसऱ्या टप्प्यात, आतापर्यंत 18.44 कोटींपेक्षा जास्त लोकांना लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.
आतापर्यंत, आज सकाळी सात वाजेपर्यंतच्या  प्राथमिक आकडेवारीनुसार, एकूण 26,87,638 सत्रांमधून 18,44,53,149  लसींच्या मात्रा लाभार्थ्यांना देण्यात आल्या. यात, 96,59,441 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिली मात्रा आणि 66,52,389 आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरी  मात्रा देण्यात आली आहे. पहिल्या फळीत काम करणाऱ्या कोरोना योध्यांपैकी 1,45,00,303 जणांना पहिली मात्रा, तर 82,17,075 जणांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील  59,39,290  लाभार्थ्यांना पहिली मात्रा आणि 45 ते 60 वर्षे वयोगटातील 92,43,104 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या  5,46,64,577 लाभार्थ्यांना पहिली मात्रा आणि 1,79,12,354 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे.
	
		
			| HCWs | 1st Dose | 96,59,441 | 
		
			| 2nd Dose | 66,52,389 | 
		
			| FLWs | 1st Dose | 1,45,00,303 | 
		
			| 2nd Dose | 82,17,075 | 
		
			| Age Group 18-44 years | 1st Dose | 59,39,290 | 
		
			| Age Group 45 to 60 years | 1st Dose | 5,76,64,616 | 
		
			| 2nd Dose | 92,43,104 | 
		
			| Over 60 years | 1st Dose | 5,46,64,577 | 
		
			| 2nd Dose | 1,79,12,354 | 
		
			|   | Total | 18,44,53,149 | 
	
देशातील दहा राज्यांत एकूण 66.70% लसींच्या मात्रा देण्यात आल्या.

गेल्या 24 तासांत 18-44  वयोगटातील 6,69,884  लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली. लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात आतापर्यंत 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण 59,39,290  लोकांना लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.
लसीकरण मोहिमेच्या 122 व्या दिवशी(17 मे, 2021) एकूण 15,10,418 लसींच्या मात्रा देण्यात आल्या. 14,447 सत्रांतून तर, 12,67,201 लाभार्थ्यांना पहिली तर 2,43,217  लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली.
गेल्या 24 तासांतल्या एकूण सक्रीय रूग्णांपैकी 74.54% रुग्ण दहा राज्यात आढळले आहेत.
 
     
दहा राज्ये—महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, दिल्ली , कर्नाटक, केरळ ,छत्तिसगढ, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये मिळून एकूण नव्या रूग्णांपैकी 73.05% रुग्ण आहेत.
कर्नाटकात  सर्वाधिक 38,603 रुग्ण आढळले आहेत. त्या खालोखाल, तामिळनाडूमध्ये 33,075 नवे रुग्ण आढळले आहेत.
देशात सध्या कोरोनाचा राष्ट्रीय मृत्यूदर 1.10% इतका आहे.  
गेल्या 24 तासात देशभरात कोविडमुळे 4,329 जणांचा मृत्यू झाला.
एकूण मृत्यूंपैकी 75.98% मृत्यू दहा राज्यात झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक (1000) मृत्यू झाले तर त्या खालोखाल कर्नाटकात 476 जणांचा मृत्यू झाला.

त्याशिवाय, भारतात परदेशातून येणाऱ्या कोविडविषयक मदतीचे वितरण सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना जलदगतीने आणि प्रभावीपणे केले जात आहे. आतपर्यंत एकूण 11,321 पेक्षा अधिक ऑक्सिजन काँसंट्रेटर्स, 15,801 पेक्षा अधिक ऑक्सिजन सिलेंडर्स, 19 ऑक्सिजन निर्मिती प्लांट्स, 7,470 पेक्षा अधिक व्हेंटीलेटर्स/ Bi PAP, सुमारे 5.5 रेमडेसीवीरच्या कुप्या आतपर्यंत मिळाल्या असून त्यांचे रस्ते आणि हवाईमार्गे वितरण करण्यात आले आहे.
****
Jaydevi PS/R.Aghor/P.Kor
*** 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:  @PIBMumbai
@PIBMumbai    /PIBMumbai
 /PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai   pibmumbai[at]gmail[dot]com
pibmumbai[at]gmail[dot]com
                
                
                
                
                
                (Release ID: 1719592)
                Visitor Counter : 313
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Assamese 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Manipuri 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Odia 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Kannada 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Malayalam