PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 07 MAY 2021 8:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली/मुंबई 7 मे 2021

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती

कोविड-19 महामारीच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येतील अभूतपूर्व वाढीची आव्हाने आणि गरजा पूर्ण करण्यासाठी भारताच्या  प्रयत्नांना मदत करण्यासाठी जागतिक समुदायाने मदतीचा हात पुढे केला आहे. भारत सरकारने  सुनिश्चित केले आहे की  राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना जागतिक मदत प्रभावीपणे आणि त्वरित वितरित केली जाईल. या महत्वपूर्ण  टप्प्यात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी  विविध माध्ममे  आणि उपाययोजनांद्वारे सर्व मदत  आणि सहाय्य पुरवणे  हे उद्दिष्ट  आहे.

तर दुसरीकडे, देशव्यापी  लसीकरण मोहिमेच्या टप्पा  -3 मध्ये आणखी विस्तार होत असल्याने देशभरात देण्यात आलेल्या लसींच्या  मात्रांची  एकूण संख्या आज 16.49  कोटीच्या पुढे गेली आहे.

30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 18-44  वर्षे वयोगटातील 11,80,798 लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लसींची पहिली मात्रा देण्यात आली.  ही राज्ये आहेत- अंदमान आणि निकोबार बेटे  (330), आंध्र प्रदेश (16), आसाम  (220), बिहार (284)  छत्तीसगड (2), दिल्ली (1,83,679) , गोवा (741) , गुजरात (2,24,109)  हरियाणा (1,69,409),हिमाचल प्रदेश  (14), जम्मू-काश्मीर  (21,249 ),झारखंड (77) ,  कर्नाटक (7,068), केरळ (22), लडाख  (86),मध्य प्रदेश (9,823), महाराष्ट्र (2,15,274), मेघालय (2), नागालँड  (2)ओडिशा  (28,327), पुदुच्चेरी (1) पंजाब (2,187) , राजस्थान (2,18,795),  तामिळनाडू (8,419 ) , तेलंगण  (440), त्रिपुरा  (2), उत्तर प्रदेश  (86,420), उत्तराखंड (17) आणि प बंगाल  (2,757).

आज सकाळी 7 वाजेपर्यंत मिळालेल्या  अहवालानुसार एकूण  24,11,300  सत्रांद्वारे एकूण 16,49,73,058  लसीच्या मात्रा देण्यात आल्या  आहेत. यामध्ये 95,01,643 आरोग्य कर्मचारी (पहिली मात्रा),63,92,248 आरोग्य कर्मचारी (दुसरी मात्रा),  1,37,64,363 आघाडीवरील  कर्मचारी (पहिली मात्रा),  75,39,007 आघाडीवरील  कर्मचारी(दुसरी मात्रा),  18-44 वयोगटातील  11,80,798  (पहिली मात्रा ) , 60 वर्षावरील ,5,33,28,112  लाभार्थी (पहिली मात्रा), 1,35,91,594 (दुसरी मात्रा) आणि 45 ते 60 वयोगटातल्या  5,43,12,908   (पहिली मात्रा), आणि 53,62,385 लाभार्थी (दुसरी मात्रा) यांचा समावेश आहे.

देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या एकूण मात्रांपैकी 66.84 टक्के  मात्रा दहा राज्यात देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासांत 23  लाखाहून अधिक लसींच्या मात्रा  देण्यात आल्या.

लसीकरण अभियानाच्या -111 व्या दिवशी ( 6 मे  2021) 23,70,298 लसीच्या  मात्रा देण्यात आल्या.

10,60,064   लाभार्थींना 18,938 सत्रात पहिली मात्रा  आणि  13,10,234  लाभार्थींना लसीची दुसरी मात्रा  देण्यात आली.

देशात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1,76,12,351 इतकी आहे.

रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 81.95  टक्के आहे.

गेल्या 24 तासांत  3,31,507 रुग्ण बरे झाले

बरे झालेल्या नवीन रुग्णांपैकी 72.47 % रुग्ण   दहा राज्यांमधील आहेत.

गेल्या 24 तासात 4,14,188  नव्या रुग्णांची नोंद झाली.

नव्या रुग्णांपैकी 71.81  रुग्ण, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, केरळ, बिहार,  प . बंगाल,  तामिळनाडू , आंध्र प्रदेश,आणि राजस्थान  या दहा राज्यांमध्ये आहेत.

महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 62,194  नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली. त्याखालोखाल कर्नाटकात 49,058  तर  केरळमध्ये 42,464  नव्या रुग्णांची नोंद झाली

भारतात आज उपचाराधीन  रुग्णांची एकूण  संख्या 36,45,164  आहे. ही देशातल्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णांच्या 16.96 % आहे.

देशातल्या एकूण उपचाराधीन रुग्णसंख्येपैकी 81.04 रुग्ण  बारा  राज्यांमध्ये आहेत.

देशातील एकूण उपचाराधीन रुग्णसंख्येत  दहा जिल्ह्यांचा वाटा  25 टक्के  आहे.

एकूण बाधित रुग्णांपैकी उपचाराधीन रुग्ण 16.96 टक्के आहेत तर बरे झालेले रुग्ण  81.95 टक्क्यांपेक्षा  जास्त आहे.

राष्ट्रीय मृत्यू दरात घट होत असून हा दर सध्या 1.09 टक्के आहे.

गेल्या 24 तासात 3,915  रुग्णांचा मृत्यू झाला

यापैकी  74.48 टक्के  मृत्यू दहा राज्यातले  आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 853 जणांचा मृत्यू झाला, तर  उत्तर प्रदेशात  350  जणांचा मृत्यू झाला.

चार  राज्ये / केंद्र शासित प्रदेशात गेल्या 24 तासात कोविड -19 मुळे एकही मृत्यू झालेला नाही. यामध्ये  दमण आणि दीव आणि दादरा नगर हवेली,  अरुणाचल प्रदेश , लडाख आणि मिझोरम यांचा समावेश आहे.

इतर अपडेट्स :

महाराष्ट्र अपडेट्स :-

महाराष्ट्राने कोविड लसीकरणात 1.67 लसींच्या मात्रा देण्याचा टप्पा पूर्ण केला आहे. तसेच, लसींच्या दोन्ही मात्रा अधिकाधिक लोकांना देणारेही ते पहिले राज्य ठरले आहे. मुंबईला ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्राने (BARC) विशेष ऑक्सिजन प्लांट तयार केला आहे. पहिल्या टप्प्यात या प्लांटमधून प्रत्येकी 50 लिटर्सचा एक असे 10 सिलेंडर्स उपलब्ध होणार आहेत. या सिलेंडर्सचा पुरवठा दक्षिण मध्य मुंबईतली सरकारी रुग्णालये आणि कोविड केअर केंद्रांमध्ये केला जाईल. मागणीनुसार ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची तयारी BARC ने दर्शवली आहे. राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर्स (RCF) ने देखील गोवंडी इथल्या शताब्दी रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारला आहे.

गोवा अपडेट्‌स:-

कोरोना वाढता संसर्ग रोखण्यासाठी गोव्यात टाळेबंदी करावी लागू शकेल, असे संकेत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले आहेत. गोव्यात सध्या कोरोना प्रतिबंधात्मक कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ज्या अंतर्गत, अत्यावश्यक सेवेत समाविष्ट न होणारी सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. तसेच, चित्रपट, टीव्ही मालिका यांचे चित्रीकरण करण्याची परवानगीही रद्द करण्यात आली आहे. गोव्याची मनोरंजन विषयक संस्था- ESG ने चित्रीकरण करणाऱ्या चमूंना आपले चित्रीकरण थांबवण्यास सांगितले आहे.

 

MC/PM

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1716925) Visitor Counter : 148


Read this release in: English , Hindi , Gujarati