संरक्षण मंत्रालय
पीएम केअर कोविड रुग्णालय (धनवंतरी) अहमदाबादसाठी पश्चिम नौदल कमांडकडून अतिरिक्त नौदल कर्मचारी तैनात
Posted On:
07 MAY 2021 2:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 मे 2021
कुशल मनुष्यबळाची क्षमता वाढवण्यासाठी आणि कोविड महामारी विरूद्ध लढा अधिक तीव्र करण्यासाठी पश्चिम नौदल कमांडमधील वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग अधिकारी, निमवैद्यकीय आणि सहाय्यक कर्मचारी यांचा समावेश असलेली 41 नौदल कर्मचाऱ्यांची तुकडी पीएम केअर कोविड रुग्णालय (धनवंतरी) अहमदाबाद येथे 06 मे 21 रोजी तैनात करण्यात आली आहे. 29 एप्रिल 21 रोजी रुग्णालयात आधीच तैनात असलेल्या 57 सदस्यीय नौदल वैद्यकीय पथकाव्यतिरिक्त ही तुकडी आहे. दोन महिन्यांसाठी तैनात करण्यात आलेले हे पथक रुग्णालय प्रशासनाला कोविड रूग्ण हाताळण्यात मदत करेल.


Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1716772)
Visitor Counter : 235