दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

कोविड संबंधित आपत्कालीन पार्सलच्या जलद पुरवठ्यासाठी टपाल विभागाने सीमाशुल्क विभागाच्या सहकार्याने केली विशेष हेल्पलाईन सुरु

Posted On: 07 MAY 2021 4:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 मे 2021

कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरु असतांनाच, टपाल विभागाने सीमाशुल्क विभागाशी  समन्वय साधत, कोविड संबंधित, ऑक्सिजन काँसंट्रेटर, उपकरणे आणि औषधांच्या परदेशातून होणारा पुरवठा जलद गतीने व्हावा, याची व्यवस्था केली आहे.  या संदर्भात एक सार्वजनिक सूचनाही टपाल विभागाने जारी केली आहे.

या सार्वजनिक सूचनेनुसार, भारतातील कोविड रुग्णांना मदत व्हावी म्हणून परदेशातून पाठवलेल्या अशा स्वरुपाच्या सामानाचा पुरवठा टपाल विभागाच्या ग्राहकांना आणि इतर सार्वजनिक संस्थांना लवकरात लवकर व्हावा, या उद्देशाने, टपाल विभागाने एक हेल्पलाईन सुरु केली आहे. अशी मदत पाठवलेले ग्राहक टपाल विभागाशी संपर्क साधून त्यांच्या पार्सलची आणि त्यांची सविस्तर माहिती ( नाव, मोबाईल क्र., ईमेलट्रॅकिंग क्रमांक इत्यादी)  adgim2@indiapost.gov.in किंवा dop.covid19[at]gmail[dot]com या दोन ईमेलवर  पाठवू शकतात किंवा खालील नोडल अधिकाऱ्यांना व्हॉटसऐप वर ही माहिती पाठवू शकतात. त्यांनी पाठवलेले समान त्यानंतर जलदरित्या  इच्छित स्थळी पोचवले जाईल.

नोडल अधिकाऱ्यांची नावे :

  1. अरविंद कुमार – 9868378497
  2. पुनीत कुमार – 9536623331

 

Jaydevi PS/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1716823) Visitor Counter : 234