आयुष मंत्रालय
आयुष मंत्रालयाने आयुष 64 आणि काबासुरा कुडीनीरची देशव्यापी वितरण मोहीम सुरु केली
कोविड -19 च्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मंत्रालयाचा नवीन उपक्रम
रुग्णालयाबाहेरील कोविड रूग्ण हे लक्षित गट
Posted On:
07 MAY 2021 5:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 मे 2021
देशातील कोविड -19 संसर्गाच्या दुसऱ्या लाटेला सामोरे जाताना आयुष मंत्रालयाने आज रुग्णालयाबाहेरील बहुसंख्य कोविड रुग्णांच्या हितासाठी आयुष 64 आणि काबासुरा कुडीनीर ही बहु -वनौषधीयुक्त आयुर्वेदिक औषधे वितरीत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात देशव्यापी मोहीम सुरु केली आहे. या औषधांची कार्यक्षमता बहु -केंद्रीय क्लिनिकल चाचण्याद्वारे सिद्ध झाली आहे. युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आयुष मंत्री (अतिरिक्त प्रभार) किरेन रिजिजू यांच्या हस्ते राबवण्यात येणारी ही बहुपक्षीय मोहीम पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने गरजूंपर्यंत औषधे पोहचवणे सुनिश्चित करेल. सेवा भारती या मोहिमेत मुख्य सहयोगी आहे.
मंत्रालयाच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध संस्थांच्या विस्तृत जाळ्याचा वापर करून वितरणाचे व्यापक धोरण आखण्यात आले असून ते टप्प्याटप्प्याने राबवले जाईल आणि सेवा भारतीच्या देशभरातील नेटवर्ककडून यासाठी मदत पुरवली जाईल.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की कोविड -19 चा देशभरात उद्रेक झाल्यापासून आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाबरोबर एकत्र काम करताना आयुष मंत्रालयाने कोविड 19 चे नियंत्रण आणि त्याला आळा घालण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. आयुष-64 आणि काबासुरा कुडीनीर यांच्या वितरणसाठी देशभरात मोहीम राबवण्याचा उपक्रम मंत्रालयाने सुरु केला असून कोविड19 महामारी विरूद्ध लढ्यात आपली स्थिती बळकट करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे.
मंत्रालयाने अनेक उपाययोजना केल्या आहेत आणि कोविड 19 चे नियंत्रण आणि त्याला आळा घालण्यासाठी धोरण आखण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ञांचा समावेश असलेल्या एका आंतरशाखीय आयुष संशोधन आणि विकास कृती दलाची स्थापना केली. सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक विज्ञान (सीसीआरएएस) ने विकसित केलेल्या आयुष-64 आणि काबासुरा कुडीनीर या शास्त्रीय सिद्ध औषधाबाबत विविध प्रकारे अभ्यास करण्यात आला आहे.
आयुष मंत्रालय -वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) सहकार्याने कोविड -19 रुग्णांच्या व्यवस्थापनात आयुष 64 च्या सुरक्षिततेचे व कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी अलिकडेच बहुकेंद्रीय क्लिनिकल चाचणी पूर्ण केली आहे. आयुष मंत्रालयांतर्गत केंद्रीय सिद्ध संशोधन मंडळाने (सीसीआरएस) कोविड-19 रुग्णांच्या कार्यक्षमतेचा अभ्यास करण्यासाठी काबासुरा कुडीनीर या सिद्ध औषधाच्या क्लिनिकल चाचण्यादेखील करण्यात आल्या आणि सौम्य ते मध्यम लक्षणे असलेल्या कोविड -19 संसर्गावरील उपचारातही उपयुक्त असल्याचे आढळले आहे.
S.Tupe/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1716846)
Visitor Counter : 281