संरक्षण मंत्रालय
ऑक्सिजन आणि वैद्यकीय पुरवठा करण्यासाठी भारतीय हवाई दल आणि नौदलाचे प्रयत्न अधिक तीव्र
Posted On:
07 MAY 2021 5:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 मे 2021
भारतीय हवाई दल आणि भारतीय नौदलाने ऑक्सिजन कंटेनर आणि वैद्यकीय उपकरणे यांची वाहतूक करून सध्याच्या कोविड 19 परिस्थितीचा सामना करण्यासाठी नागरी प्रशासनाला मदत करण्यासाठी आपले प्रयत्न अधिक तीव्र केले आहेत. 7 मे, 2021 रोजी भारतीय हवाई दलाच्या सी -17 विमानाने देशभरात 400 उड्डाणे केली. यात एकूण 4,904 मेट्रिक टन क्षमतेचे 252 ऑक्सिजन टँकर्स आणण्यासाठी केलेल्या 351 उड्डाणांचा समावेश आहे. जामनगर, भोपाळ, चंदीगड, पानगढ़, इंदूर, रांची, आग्रा, जोधपूर, बेगमपेट, भुवनेश्वर, पुणे, सूरत, रायपूर, उदयपूर, मुंबई, लखनऊ, नागपूर, ग्वाल्हेर , विजयवाडा, बडोदा, दिमापूर आणि हिंडन या शहरांमध्ये ही उड्डाणे झाली.
भारतीय हवाई दलाच्या विमानाने 1,252 रिकाम्या ऑक्सिजन सिलिंडर्सबरोबरच 1,233 मेट्रिक टन क्षमतेच्या 72 क्रायोजेनिक ऑक्सिजन स्टोरेज कंटेनर्स विमानातून आणण्यासाठी 59 आंतरराष्ट्रीय उड्डाणे केली. कंटेनर्स आणि सिलिंडर्स सिंगापूर, दुबई, बँकॉक, ब्रिटन, जर्मनी, बेल्जियम आणि ऑस्ट्रेलिया येथून खरेदी करण्यात आले. याव्यतिरिक्त, सी -17 आणि आयएल-76 या विमानाना इस्त्राईल आणि सिंगापूरमधून क्रायोजेनिक ऑक्सिजन कंटेनर्स , ऑक्सिजन जनरेटर्स आणि व्हेंटिलेटर्स आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मित्र देशांकडून ऑक्सीजन कंटेनर्स / सिलेंडर्स / कॉन्सेंट्रेटर्स आणि संबंधित उपकरणे आणण्यासाठी भारतीय नौदलाने आयएनएस तलवार, आयएनएस कोलकाता, आयएनएस ऐरावत, आयएनएस कोची, आयएनएस तबर, आयएनएस त्रिकंद, आयएनएस जलाश्व आणि आयएनएस शार्दुल ही जहाजे तैनात केली आहेत. त्यांचा तपशील खालीलप्रमाणेः
Ship Name
|
Medical Supplies
|
Country/Port
|
Status
|
INS Talwar
|
27-MT oxygen containers – 02
|
Bahrain
|
Arrived at New Mangalore on May 05, 2021
|
INS Kolkata
|
Oxygen cylinders – 200
Oxygen concentrators - 43
+
Oxygen cylinders - 200
27-MT oxygen containers – 02
Oxygen concentrators– 04
|
Doha, Qatar
+
Kuwait
|
Expected arrival at Mundra on May 09, 2021
|
INS Kochi
|
27-MT oxygen containers - 03
Oxygen concentrators - 03
Oxygen cylinders–800
|
Kuwait
|
Expected arrivalat Mundra/Mumbaion May 10/11, 2021
|
INS Tabar
|
27-MT oxygen containers - 02
Oxygen cylinders–600
|
Kuwait
|
Expected arrivalat Mundra/Mumbai on May 10/11, 2021
|
INS Trikand
|
27-MT oxygen containers– 02
|
Doha, Qatar
|
Expected arrivalat Mumbai on May 10, 2021
|
INS Airavat
|
20 T empty cryogenic oxygen cylinders – 08
Empty oxygen cylinders - 3,150
Filled oxygen cylinders – 500
Oxygen concentrators - 07
Rapid Antigen Test kits - 10,000
PPE kits – 450
|
Singapore
|
Expected arrivalat Visakhapatnam on May 10, 2021
|
येत्या काही दिवसांत दोहा, कुवैत व मुआरा, ब्रुनेई येथून ऑक्सिजन कंटेनर्स आणि इतर वैद्यकीय सामुग्री आणण्यासाठी अनुक्रमे आयएनएस तर्कश , आयएनएस शार्दुल आणि आयएनएस जलाश्वचे नियोजन केले आहे.
Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1716839)
Visitor Counter : 275