रेल्वे मंत्रालय
ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून आतापर्यंत 185 टँकर्समधून 2960 मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनचा विविध राज्यांमध्ये पुरवठा
राजस्थानसाठीची पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस कोटा येथे पोहोचली
महाराष्ट्रासाठीची ऑक्सिजन एक्सप्रेस नागपूरकडे रवाना
47 ऑक्सिजन एक्सप्रेसचा प्रवास पूर्ण
आतापर्यंत, महाराष्ट्रात 174 मेट्रिक टन, उत्तरप्रदेशात 729 मेट्रिक टन, 249 मध्यप्रदेशात, 305 मेट्रिक टन हरियाणात, 123 मेट्रिक टन तेलंगणा आणि 1334 मेट्रिक टन ऑक्सिजनचा दिल्लीत पुरवठा
Posted On:
07 MAY 2021 5:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 मे 2021
सर्व अडचणींवर मात करत आणि समस्यांवर नवनवीन उपाययोजना शोधत भारतीय रेल्वे देशभरातील विविध राज्यांमध्ये ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून द्रवरूप ऑक्सिजन एक्सप्रेसचा पुरवठा करत आहे. आतपर्यंत रेल्वेने 185 टँकर्समधून एकूण 2960 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा केला आहे.
आजवर 47 ऑक्सिजन एक्सप्रेसने आपला प्रवास पूर्ण केला आहे.
भारताच्या विविध भागात कमीतकमी वेळेत गरजू राज्यांना ऑक्सिजन पुरवठा करण्याचा हा रेल्वेचा प्रयत्न आहे.
आतापर्यंत, रेल्वेने महाराष्ट्रात 174 मेट्रिक टन, उत्तरप्रदेशात 729 मेट्रिक टन, 249 मध्यप्रदेशात 305 मेट्रिक टन, हरियाणात, 123 मेट्रिक टन तेलंगणा आणि 1334 मेट्रिक टन ऑक्सिजनचा दिल्लीत पुरवठा केला आहे.
सध्या 18 ऑक्सिजन टँकर्सचा प्रवस सुरु असून त्यातून 260 मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजन महाराष्ट्र, दिल्ली आणि हरियाणा येथे पोचणार आहे. नव्या ऑक्सिजन टँकर्सची वाहतूक ही अव्याहतपाणे चालणारी प्रक्रिया असून तिची आकडेवारी सतत अद्ययावत होत असते. आज रात्री आणखी काही ऑक्सिजन एक्सप्रेस रवाना होणे अपेक्षित आहे.
Jaydevi PS/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1716853)
Visitor Counter : 250