आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 17.35 कोटी मात्रा मोफत पुरविल्या


राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे लसीच्या 90 लाखांहून अधिक मात्रा अजूनही उपलब्ध

या मात्रांव्यातिरिक्त येत्या 3 दिवसांत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आणखी 10 लाखांहून अधिक लसींच्या मात्रा मिळतील

Posted On: 07 MAY 2021 10:24AM by PIB Mumbai

“संपूर्णतः सरकार” दृष्टीकोनाच्या माध्यमातून केंद्र सरकार, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने कोविड-19 विरोधी लढाईत आघाडी घेत आहे. महामारीचा प्रतिबंध तसेच व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारने राबविलेल्या चाचण्या, संपर्कशोध, उपचार आणि कोविड योग्य वर्तणूक यांसह पाच मुद्द्यांच्या धोरणाचा लसीकरण हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.   

कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या, व्यापक आणि गतिशील  अशा तिसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी 1 मे 2021 पासून सुरु झाली आहे. लसीकरण करून घेण्यासाठी पात्र लाभार्थी कोविन पोर्टलवर (cowin.gov.in) थेट नोंदणी करू शकतात किंवा आरोग्यसेतू अॅपच्या माध्यमातून त्यांची  नाव नोंदवू शकतात.

केंद्र सरकारने आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 17 कोटी 35 लाखांहून जास्त (17,35,07,770)  मात्रा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत पुरविल्या आहेत. आज सकाळी 8 वाजता मिळालेल्या आकडेवारीनुसार वाया गेलेल्या मात्रांसह आतापर्यंत एकूण 16,44,77,100 मात्रांचा वापर झाला आहे.

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांकडे अद्याप कोविड  प्रतिबंधक लसीच्या  90 लाखांहून जास्त (90,30,670) मात्रा वापरण्यासाठी शिल्लक आहेत. राज्यांनी संरक्षण दलांना पुरविलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांची निश्चित आकडेवारी अजून प्राप्त झाली नसल्याने, काही राज्यांमध्ये त्यांना केंद्राकडून पुरविण्यात आलेल्या मात्रांपेक्षा वाया गेलेल्या मात्रांसह अधिक मात्रा त्यांनी वापरल्याचे दिसून आले आहे.

तसेच, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांना आधी पुरवण्यात आलेल्या मात्रांखेरीज येत्या 3 दिवसांत 10 लाखांहून अधिक (10,25,000) मात्रा पुरविण्यात येणार आहेत.

***

Jaidevi PS/ Sanjan C/ DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1716713) Visitor Counter : 219