मंत्रिमंडळ
भारतीय स्पर्धात्मकता आयोग आणि ब्राझीलची आर्थिक संरक्षण प्रशासकीय परिषद यांच्यात सामंजस्य करार
प्रविष्टि तिथि:
20 APR 2021 5:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 एप्रिल 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्री मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत भारतीय स्पर्धात्मकता आयोग, सीसीआय आणि ब्राझीलची आर्थिक संरक्षण प्रशासकीय परिषद,सीएडीई यांच्यातल्या सामंजस्य कराराला मंजुरी देण्यात आली.
स्पर्धात्मकता कायदा 2002 च्या कलम 18 नुसार सीसीआयला, आपले कर्तव्य निभावण्यासाठी किंवा कायद्या अंतर्गत सोपवलेले कार्य करण्यासाठी दुसऱ्या देशातल्या कोणत्याही एजन्सीशी करार अथवा व्यवस्था करण्याची परवानगी आहे.
त्याला अनुसरून सीसीआयने सहा सामंजस्य करार केले आहेत-
- संघीय व्यापार आयोग (एफटीसी ) आणि अमेरिकेचा न्याय विभाग (डीओजे)
- स्पर्धात्मकता महासंचालक, युरोपीय महासंघ
- संघीय मक्तेदारी विरोधी सेवा, रशिया
- ऑस्ट्रेलियन स्पर्धात्मकता आणि ग्राहक आयोग
- स्पर्धात्मकता ब्युरो कॅनडा
आणि
- ब्रिक्स स्पर्धात्मकता प्राधिकरण
सध्याचा प्रस्ताव सीसीआय आणि सीएडीई यांच्यात झालेल्या अशाच प्रकारच्या सामंजस्य कराराशी संबंधित आहे.
* * *
Jaydevi PS/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1712949)
आगंतुक पटल : 306
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada