पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी आचार्य महामंडलेश्वर पूज्य स्वामी अवधेशानंद गिरी जी यांच्याशी दूरध्वनी द्वारे केली चर्चा
दोन शाही स्नानांनंतर कुंभ प्रतीकात्मक पद्धतीने चालविण्याची केली विनंती
मेळ्यातील संतांच्या आरोग्याची पंतप्रधानांनी चौकशी केली
Posted On:
17 APR 2021 9:25AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचार्य महामंडलेश्वर पूज्य स्वामी अवधेशानंद गिरी जी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला आणि त्यांच्याकडे संतांच्या आरोग्याबाबत चौकशी केली. या पर्वादरम्यान प्रशासनाला पूर्ण सहकार्य केल्याबद्दल पंतप्रधानांनी संत समाजाचे आभार मानले.
मेळ्यातील दोन शाही स्नाने आधीच पार पडली असल्याने आता यानंतरचे कुंभ प्रतीकात्मक पद्धतीने साजरे करण्याची विनंती पंतप्रधानांनी या संभाषणात केली. यामुळे महामारीविरुद्धचा लढा बळकट होईल असे ते म्हणाले.
आचार्य महामंडलेश्वर पूज्य स्वामी अवधेशानंद गिरी जी यांनीदेखील पंतप्रधानांच्या या विनंतीचा मान राखत भक्तांनी कुंभ स्नानासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करू नये तसेच सर्व कोविडयोग्य वर्तणूक अनुसरावी आणि सर्व नियम नीट पाळावे असे आवाहन केले.
***
Jaydevi PS/SC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1712390)
Visitor Counter : 317
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada