आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतातील एकूण लसीकरणाने गाठला जवळपास 8 कोटींचा टप्पा


Posted On: 05 APR 2021 5:58PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 एप्रिल 2021 

 

कोविड -19  विरूद्धच्या लढा देण्याच्या  देशाच्या  महत्त्वपूर्ण प्रगतीमध्ये, देशभरात  दिल्या गेलेल्या कोविड -19  विरूद्धच्या लसींच्या डोसची एकूण संख्या आज 7.9 कोटींवर गेली आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या  तात्पुरत्या अहवालानुसार एकूण 12,31,148 सत्रांद्वारे ,7,91,05,163 लसींचे डोस दिले गेले आहेत.

HCWs

FLWs

Over 45 years

 

Total

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

90,09,353

53,43,493

97,37,850

41,33,961

4,99,31,635

9,48,871

7,91,05,163

Date: 4th April,2021

HCWs

FLWs

Over 45 years

Total Achievement

1stDose

2ndDose

1stDose

2nd Dose

1stDose

2ndDose

1stDose

2ndDose

1,470

9,461

2,665

16,547

15,36,541

71,780

15,40,676

97,788

8 राज्यांत आत्तापर्यंत एकूण 60% संचयित लसीकरण झाले आहे.

देशात दररोज आढळणा-या रूग्णसंख्येत वाढ होत आहे.

गेल्या 24 तासांत एक लाखांहून अधिक (1,03 558) नव्या रूग्णांची नोंद झाली.महाराष्ट्रात सर्वाधिक 57,074 (55.11%) नव्या रूग्णांची नोंद झाली. त्याखालोखाल छत्तीसगडमध्ये 5,250 तर कर्नाटकात 4,553 नव्या रूग्णांची नोंद झाली.

देशातील एकूण रूग्णसंख्या आता 7,41,830 इतकी झाली आहे.ही संख्या एकूण सक्रीय रूग्णसंख्येच्या 5.89% इतकी आहे. गेल्या 24 तासांत 50,233 नव्या सक्रीय रूग्णांची नोंद झाली.

देशातील एकूण सक्रिय रूग्णांत एकट्या महाराष्ट्राचा वाटा 58.23% आहे.

गेल्या 24 तासांत 478 मृत्यूंची नोंद झाली.

8 राज्यातील मृत्यूंचे प्रमाण 84.52%इतके आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली.त्याखालोखाल पंजाबमधे 51 मृत्यू झाले.

 

* * *

M.Chopade/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1709694) Visitor Counter : 296