पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोर्तुगालचे पंतप्रधान महामहीम अँटोनियो लुई सँटोस दा कोस्टा, यांच्यात दूरध्वनीवरून संवाद
प्रविष्टि तिथि:
16 MAR 2021 8:25PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पोर्तुगालचे पंतप्रधान महामहिम अँटोनियो लुई सँटोस दा कोस्टा यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
यावेळी उभय नेत्यांनी दोन्ही देशांमधील कोविड-19 साथीच्या आजाराच्या परिस्थितीचा आढावा घेतला. महामारीच्या समूळ उच्चाटनासाठी लसींच्या त्वरित व न्याय्य वितरणाचे महत्व यावेळी उभय नेत्यांनी नमूद केले.
पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान कोस्टा यांना भारताच्या लसीकरण मोहिमेविषयी तसेच आत्तापर्यंत 70 हून अधिक देशांना भारताने केलेल्या मदतीची माहिती दिली. भारत आपल्या क्षमतेनुसार इतर देशांच्या लसीकरण मोहिमेला सहाय्य करेल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
उभय नेत्यांनी यावेळी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला आणि गेल्या काही वर्षांत भारत-पोर्तुगाल भागीदारीतील सकारात्मक गतीबद्दल समाधान व्यक्त केले.
मे 2021 मध्ये पोर्तो येथे युरोपियन संघटनेच्या पोर्तुगीज अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या पहिल्या भारत-युरोपियन संघटनेच्या नेत्यांच्या बैठकीच्या तयारीचा त्यांनी आढावा घेतला. भारत- युरोपियन संघटनेच्या धोरणात्मक भागीदारीला बळकटी देण्यासाठी पंतप्रधान कोस्टा यांनी घेतलेल्या भूमिकेचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले आणि ते म्हणाले की, त्यांना पोर्तो येथे भेटण्यासाठी मी उत्सुक आहे.
M.Chopade/S.Mhatre/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1705261)
आगंतुक पटल : 217
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam