पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी मिझोरमच्या नागरिकांना राज्य स्थापना दिनाच्या दिल्या शुभेच्छा

Posted On: 20 FEB 2021 11:58AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिझोरममधील नागरिकांना राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

"मिझोरममधील माझ्या बंधू आणि भगिनींना राज्य स्थापना दिनानिमित्त मी शुभेच्छा देतो. संपूर्ण देशाला महान मिझो संस्कृतीचा अभिमान आहे. मिझोरममधील लोक हे त्यांची, निसर्गाशी एकरूप होऊन राहण्यास वचनबद्ध असलेली वृत्ती आणि दयाळू स्वभाव यासाठी ओळखले जातात. राज्याच्या निरंतर प्रगतीसाठी मी प्रार्थना करतो.", असे पंतप्रधानांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.

***

Best wishes to my sisters and brothers of Mizoram on their Statehood Day. The entire nation is proud of the great Mizo culture. The people of Mizoram are known for their kindness and commitment towards living in harmony with nature. Praying for the state’s continuous growth.

— Narendra Modi (@narendramodi) February 20, 2021

S.Tupe/S.Shaikh/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1699582) Visitor Counter : 75