PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 03 FEB 2021 5:51PM by PIB Mumbai

 

दिल्ली-मुंबई, 3 फेब्रुवारी 2021

 

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

 

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

 

Image

Image

Image

Image

 

Image

संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनादरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलेले अभिभाषण :  कोरोना महामारीच्या काळात होणारे संसदेचे हे संयुक्त अधिवेशन विशेष महत्वाचे आहे. ही नव्या वर्षाचीच नव्हे तर नव्या दशकाची सुरुवात आहे. तसेच याच वर्षात देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे होत असून त्याच्या अमृतमहोत्सवाची सुरुवात होत आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक आर्थिक मंचाच्या दावोस चर्चासत्रामध्ये दूरदृश्य प्रणालीव्दारे संवाद साधला. ‘‘चौथी औद्योगिक क्रांती - मानवतेच्या हितार्थ तंत्रज्ञानाचा वापर’’या विषयावर पंतप्रधानांनी भाषण केले. या कार्यक्रमामध्ये त्यांनी विविध संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशीही संवाद साधला. याप्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, 1.3 अब्ज भारतीयांकडे असलेला आत्मविश्वास, सकारात्मकता आणि आशा यांचा संदेश आपण घेऊन आलो आहोत. महामारीच्या काळात भारताने ज्या पद्धतीने आपल्या क्षमता सिद्ध केल्या आणि या संकटाशी सामना केला, त्याचा अतिशय फायदा झाला. प्रारंभीच्या काळात संकटाची जाणीव झाल्यानंतर भारताने सक्रियता आणि सहभागीदारीच्या माध्यमातून सक्षम होण्याचा दृष्टिकोन स्वीकारला. त्याचा लाभ म्हणजे भारतामध्ये कोविडसाठी आवश्यक असणाऱ्या आरोग्यविषयक पायाभूत सुविधा बळकट करण्याचे काम वेगाने करण्यात आले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

कोरोनाच्या विरोधातली भारताची  लढाई एक उदाहरण म्हणून समोर आली असतानाच भारताचा लसीकरण कार्यक्रम  ही जागतिक पातळीवर त्याच्या सर्वाधिक वेगामुळे  गौरवला जात आहे असे पंतप्रधान नानरेंद्र मोदी यांनी सांगितले. मन की  बात या आकाशवाणीवरील  कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधताना ते पुढे म्हणाले  आज भारत जगातला सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम राबवत आहे ही अभिमानाची गोष्ट असून जगात सर्वाधिक वेगानं  लसीकरणही करत आहोत. केवळ 15 दिवसांमध्ये, भारतानं, आपल्या 30 लाखांहून अधिक, कोरोना योद्ध्यांचं लसीकरण केलं असून अमेरिकेसारख्या समृद्ध देशातही, या कामासाठी 18 दिवस लागले होते तर ब्रिटनला तब्बल 36 दिवस लागले होते असे त्यांनी सांगितले. भारतात बनवलेली लसदेशाच्या आत्मनिर्भरतेची आणि  आत्मसम्मानाचंही प्रतिक असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की यंदाच्या अर्थसंकल्पात वास्तविकतेची जाणीव  आणि विकासाचा आत्मविश्वास आहे आणि यातून भारताचा आत्मविश्वास दिसून येतो. या कठीण काळात हा अर्थसंकल्प जगात एक नवीन आत्मविश्वास घेऊन येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती :

कोविड महामारीशी सुरु असलेल्या लढ्यात यशाची नवनवीन शिखरे गाठत भारताचे मार्गक्रमण सातत्याने सुरु आहे.

याच मार्गावर यशाचा मोठा टप्पा गाठत, भारताने तब्बल 40 लाख लोकांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करून, जगातील सर्वात वेगवान लसीकरण करणारा देश म्हणून नोंद केली आहे. देशाने हा टप्पा 18 दिवसांत गाठला आहे.

नागरिकांना कोविड – 19 लसीचे सर्वात जास्त डोस देणाऱ्या, जगातील पहिल्या पाच देशांमध्ये भारताचा समावेश होता. तसेच भारताने अत्यंत वेगाने लसीकरणाची मोहीम यापुढेही सुरुच ठेवली आहे. कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात इतर अनेक आघाड्यांवर देखील देश रोज विविध प्रकारचे यश संपादन करीत आहे. देशातील अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह, दीव-दमण आणि दादरा-नगर हवेली, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मिझोराम, नागालँड, लक्षद्वीप, लडाख(कें.प्र.), सिक्कीम, मणिपूर,पुदुचेरी, गोवा, ओडिशा आणि आसाम या 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये गेल्या 24 तासांत एकाही कोविड रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. प्रतिदिन रोगमुक्त होणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ आणि मृत्युदरात सातत्याने घट यामुळे, भारतात सक्रीय कोविड–19 रुग्णांच्या संख्येत घसरण होण्याचा कल कायम आहे. देशात गेल्या 24 तासांत सक्रीय कोविड रुग्णांची संख्या कमी होऊन 1,60,057 इतकी झाली आहे. त्यामुळे देशातील सध्या सक्रीय कोविड रुग्णांचे प्रमाण एकूण कोविड रुग्णांच्या 1.5% पेक्षाही कमी (सध्या 1.49% इतके कमी) झाले आहे.

देशात गेल्या 24 तासांत 11,039 नव्या कोविड बाधितांची नोंद झाली. हा गेल्या 7 महिन्यांच्या काळातील नीचांक आहे. तर याच 24 तासांच्या कालावधीत 14,225 रुग्ण बरे झाले. यामुळे, देशाच्या एकूण सक्रीय रुग्णसंख्येत 3,296 ची घसरण झाली. देशात एकूण कोविड मुक्त झालेल्यांची संख्या 1,04,62,631 आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर सर्वात जास्त राष्ट्रीय रोगमुक्ती दर असलेल्या देशांमध्ये भारताने (97.08%) स्थान टिकवून ठेवले आहे. एकूण सक्रीय कोविड रुग्ण आणि रोगमुक्त झालेले यांच्यातील तफावत सतत वाढत असून सध्या ती 1,03,02,574 इतकी आहे. देशातील 31 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 5000 पेक्षाही कमी सक्रीय कोविड रुग्ण आहेत. देशातील 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये साप्ताहिक पातळीवर सक्रीय कोविड बाधितांच्या नोंदीचा दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा (1.91%) जास्त आहे.

देशभरात सुरु असलेल्या कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत 3 फेब्रुवारी2021 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत 41 लाखांहून जास्त (41,38,918) लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत, एकूण 3,845 सत्रांमध्ये झालेल्या लसीकरणात 1,88,762 आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. लसीकरणासाठी आतापर्यंत एकूण 76,576 सत्रे घेण्यात आली आहेत. नव्या कोविड मुक्तांपैकी 85.62% रुग्ण 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत. नव्या कोविड बाधित रुग्णांपैकी 83.01% रुग्ण देशातील 6 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत. गेल्या 24 तासांमध्ये देशात 110 कोविड बाधितांचा मृत्यू झाला.

महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 30 कोविडबाधितांचा मृत्यू झाला तर केरळमध्ये 16 जणांना या आजारामुळे प्राण गमवावे लागले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

 

इतर अपडेट्स:

केंद्रिय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी ब्रिटिश असोसिएशन ऑफ फिजिशिअन्स ऑफ इंडिया ओरिजिन (बीएपीआयओ) वेल्सच्या वार्षिक परिषदेमध्ये निर्माण भवन येथून डिजिटल माध्यमातून संबोधित केले. “कोविड इन इंडिया- ए सक्सेस स्टोरी” (भारतातील कोविड- एक यशोगाथा) हा त्यांचा भाषणाचा विषय होता.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

संक्षिप्त स्वरूपात अर्थसंकल्प : सार्वत्रिक आरोग्य सर्वव्यापी होण्याच्या दृष्टीने स्वच्छ पाणी, स्वच्छता व स्वच्छ वातावरणाचे महत्त्व वारंवार सांगण्यावर जागतिक आरोग्य संघटनेने भर दिला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 ने या क्षेत्रांना महत्त्वपूर्ण तरतुदी केल्या आहेत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

केंद्रीय अर्थ आणि  कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारमण यांनी  संसदेत आर्थिक सर्वेक्षण 2020-21 सादर केले. कोविड योद्धयांना समर्पित आर्थिक सर्वेक्षण 2020-21 चे ठळक मुद्दे वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली  दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून, कोविड-19 विषयक मंत्रीगटाची 23 वी बैठक झाली.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोविड -19 व्यवस्थापनासंदर्भात सार्वजनिक आरोग्य उपाययोजनांमध्ये राज्य आरोग्य प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी केरळ व महाराष्ट्रात दोन उच्च-स्तरीय बहु-शाखीय पथके तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात पाठवण्यात येणाऱ्या केंद्रीय पथकात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र  (एनसीडीसी) आणि डॉ. आरएमएल रुग्णालय, नवी दिल्ली येथील तज्ज्ञांचा समावेश आहे तर केरळसाठीच्या पथकात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण कार्यालय, तिरुअनंतपुरम आणि लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालय, नवी दिल्लीमधील तज्ञांचा समावेश असेल.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

सिनेमागृहे आणि नाट्यगृहांमधून कोविड 19 चा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधित उपाययोजना म्हणून केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मानक कार्यपद्धती जाहीर केली आहे. सिनेमागृहे आता संपूर्ण क्षमतेने सुरू करता येतील, असे मंत्र्यांनी निर्णयाची घोषणा करताना सांगितले. निर्जंतुकीकरण आणि कोविड नियमावलीचे काटेकोरपणे पालन केले गेले पाहिजे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी  दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य सचिव आणि राज्यांमधील राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे वैद्यकीय संचालक यांच्याशी संवाद साधून देशभरामध्ये सुरू असलेल्या कोविड लसीकरणाचा आढावा घेतला. या लसीकरण मोहिमेला पंतप्रधानांच्या हस्ते 16 जानेवारी, 2021 रोजी प्रारंभ झाला होता.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

महाराष्ट्र अपडेट्स:

महाराष्ट्रात मंगळवारी 1927 नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली तर 4,011 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. आतापर्यंत 19,36,305 कोविड-19 रुग्णांना उपचारानंतर सोडण्यात आले आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 95.37% असून मृत्यू दर 2.52% इतका आहे. पॉसिटीव्हीटी दर आतापर्यंत 13.80 टक्क्यांवर स्थिर राहिला आहे. कोविड19 व्यवस्थापनात राज्याला मदत करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या केंद्रीय पथकाला संपूर्ण सहकार्य केले जाईल आणि राज्यातील आरोग्य कर्मचारी केंद्रासोबत समन्वय साधत कार्य करतील असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. महाराष्ट्रासाठी नियुक्त करण्यात आलेल्या केंद्रीय पथकात नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (एनसीडीसी) आणि डॉ. आरएमएल हॉस्पिटल, नवी दिल्ली येथील तज्ज्ञांचा समावेश आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत 334 ने वाढ झाली असून ही संख्या आता 3,09,631 इतकी झाली आहे. शहरात मंगळवारी या आजारामुळे 7 जणांचा मृत्यू झाला तर 455 रुग्ण बरे झाले.

 

FACT CHECK

 

 

 

 

 

 

 

Image

Image

 

*******

S.Tupe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1694866) Visitor Counter : 276