आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
डॉ. हर्ष वर्धन यांनी ब्रिटिश असोसिएशन ऑफ फिजिशिअन ऑफ इंडियन ओरिजिन (बीएपीआयओ) वेल्सच्या वार्षिक परिषदेला कोविड -19 विरोधातील लढ्यात भारताच्या यशाबद्दल केले संबोधित
निराशाजनक अंदाज बांधणाऱ्यांना भारताने दिले चोख प्रत्युत्तर
Posted On:
31 JAN 2021 6:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 जानेवारी 2021
केंद्रिय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी ब्रिटिश असोसिएशन ऑफ फिजिशिअन्स ऑफ इंडिया ओरिजिन (बीएपीआयओ) वेल्सच्या वार्षिक परिषदेमध्ये निर्माण भवन येथून डिजिटल माध्यमातून संबोधित केले. “कोविड इन इंडिया- ए सक्सेस स्टोरी” (भारतातील कोविड- एक यशोगाथा) हा त्यांचा भाषणाचा विषय होता.
प्रारंभी, डॉ. हर्ष वर्धन यांनी कोविड-19 महामारीचा प्रारंभ झाल्यापासून भारताने वर्षभर दिलेल्या लढ्याची आठवण करून दिली. ते म्हणाले, “डिसेंबर 2019 मध्ये कोविड महामारीला प्रारंभ झाला आणि जगभरात तिचा प्रसार झाला. ‘संपूर्ण सरकार’ आणि ‘संपूर्ण समाज’ बरोबर घेण्याचा दृष्टिकोन ठेवल्यामुळे, अन्य देशांच्या तुलनेत आम्ही या महामारीविरोधात लढा देऊ शकलो. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) महामारी जाहीर केल्यानंतर त्यास तासाभरात प्रतिसाद देणारा भारत हा पहिला देश होता. 8 जानेवारीपासून नियोजनाला सुरूवात झाली, 17 तारखेपर्यंत संपूर्ण देशभरासाठी मार्गदर्शक सूची तयार करण्यात आली, त्याच दिवसापासून अत्यंत दक्ष राहून मोठ्या प्रमाणात संपर्क शोधण्यास प्रारंभ झाला. विषाणूला विलग ठेवणारा देखील भारत हा पहिला देश होता. आरोग्यसेवेतील पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करून, एनआयव्हीच्या एकमेव प्रयोगशाळेपासून आम्ही आजपर्यंत प्रयोगशाळांची सुविधा वाढवून ती 2,362 पर्यंत नेली आहे, लोकांमधील कोविडची तीव्रता लक्षात घेऊन 15,000 आरोग्य सुविधा केंद्रांमध्ये 19 लाखांपेक्षा अधिक बेड उपलब्ध करून देण्यापर्यंतची सोय आम्ही केली, सोप्या पद्धतीने विलगीकरण करता यावे, यासाठी 12,000 विलगीकरण कक्ष उभारले. प्रतिदिन 5 लाख पीपीई किटचे उत्पादन सुरू करून आत्मनिर्भर होण्याकडे पाऊल टाकण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि धाडसी निर्णय देशाने घेतला. आम्ही बायो-रेपॉजिटरीज देखील तयार केल्या आहेत, तर जिनोम सिक्वेन्सिंग देखील 6 महिन्यांपूर्वी सुरू झाले आहे.”
“22 मार्च रोजी लोकांनी जनता कर्फ्यूसाठी पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिला आणि स्वतःला, त्यांच्या कुटुंबाला आणि संपूर्ण समाजाला विषाणूंपासून वाचविण्यासाठी स्वतःवर निर्बंध लादले. जगाचा रुग्ण बरे होण्याच्या सर्वाधिक दरामागे ‘संपूर्ण समाजासाठी’ हा दृष्टिकोन असल्यामुळे खूप मोठा फरक घडवून आणला.”पुढच्या सहा ते सात महिन्यांपर्यंत अन्न आणि इतर मूलभूत गरजा उपलब्ध होतील, याची खात्री करून समाजाच्या असुरक्षित घटकांच्या व्यथा सरकारने कशा कमी केल्या तसेच स्थलांतरित मजुरांना विशेष रेल्वेच्या माध्यमातून त्यांच्या मूळ गावी परत पाठविण्याच्या तरतूदींची देखील त्यांनी यावेळी सविस्तर माहिती दिली.
सरकारच्या प्रत्येक घटकाने महामारीच्या काळात संपूर्ण देशभर प्रवास करण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी समन्वयाने कसे वागले पाहिजे, यावर भर दिला, डॉ. हर्ष वर्धन यांनी नमूद केले की, “सर्व प्रयत्नांसह, कोविड काळामध्ये वागण्याच्या योग्य पद्धती शिकविणे गरजेचे होते, ज्यासाठी पंतप्रधानांनी आठ ते नऊ वेळा स्वतःहून देशाला संबोधित केले. कोविड संदर्भात वागण्याच्या योग्य पद्धतींची माहिती लोकांना समजावी यासाठी कॉलर ट्यून सेट करण्यात आल्या, आसपासच्या बाधित रुग्णांची माहिती आरोग्य सेतू अप्लिकेशनच्या माध्यमातून दिली जाऊ लागली, जवळपास 160 दशलक्ष लोकांनी हे अप्लिकेशन डाऊनलोड केले.”
देशाला भेडसावणाऱ्या अनेक पूर्वग्रहांनाही त्यांनी चर्चेत आणले, अनेक उच्च विद्यापीठांमधील सातत्याने निराशावादी वक्तव्य करणाऱ्या काही व्यक्तींनी असा अंदाही बांधला होता की याकाळात देशभरात 30 ते 40 कोटी लोक बाधित होतील आणि 60 लाख लोक दगावतील. मात्र, याऊलट भारतातील रुग्ण संख्या 10.7 दशलक्ष आहे (10.4 दशलक्ष रुग्ण यापूर्वीच बरे झाले आहेत), एकूण रुग्णसंख्येच्या केवळ 1.58 टक्के रुग्ण संख्या ही सक्रीय रुग्णांची आहे, रुग्णांचा बरे होण्याचा दर 97 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे तर मृत्यूदर जगात सर्वांत कमी म्हणजे 1.44 टक्के इतका राहिला आहे.
G.Chippalkatti/S.Shaikh/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1693752)
Visitor Counter : 202