आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 व्यवस्थापनासंदर्भात सार्वजनिक आरोग्य उपाययोजनांमध्ये सहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारकडून केरळ व महाराष्ट्रात उच्चस्तरीय पथके
Posted On:
02 FEB 2021 12:04PM by PIB Mumbai
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोविड -19 व्यवस्थापनासंदर्भात सार्वजनिक आरोग्य उपाययोजनांमध्ये राज्य आरोग्य प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी केरळ व महाराष्ट्रात दोन उच्च-स्तरीय बहु-शाखीय पथके तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.
बहुतांश सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशात कोविड -19 मुळे बाधित होणाऱ्यांची तसेच मृत्यू पावलेल्यांची संख्या कमी होत असताना केरळ आणि महाराष्ट्रात अजूनही मोठ्या संख्येने नवे रुग्ण आढळत आहेत. सध्या या दोन राज्यांमध्येच देशातील एकूण उपचाराधीन रुग्णांपैकी जवळपास 70% रुग्ण आहेत.
महाराष्ट्रात पाठवण्यात येणाऱ्या केंद्रीय पथकात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (एनसीडीसी) आणि डॉ. आरएमएल रुग्णालय , नवी दिल्ली येथील तज्ज्ञांचा समावेश आहे तर केरळसाठीच्या पथकात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण कार्यालय, तिरुअनंतपुरम आणि लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालय , नवी दिल्लीमधील तज्ञांचा समावेश असेल.
U.Ujgare/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1694355)
Visitor Counter : 262