पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान मोदी यांनी भारतरत्न एमजीआर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त वाहिली श्रध्दांजली

Posted On: 17 JAN 2021 8:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 जानेवारी 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न डॉ.एम.जी.रामचंद्रन  यांना आज त्यांच्या जयंतीनिमित्त  श्रध्दांजली वाहिली.ते म्हणाले, की एमजीआर यांनी चित्रपटांच्या पडद्यापासून ते राजकीय पटलापर्यंत लोकांच्या ह्रदयावर अधिराज्य केले. देशातील विविध प्रातांना गुजरातमधील केवाडीया येथे जोडणाऱ्या आठ गाड्या रवाना करतांना आणि रेल्वेच्या विविध प्रकल्पांचे उदघाटन करताना ते व्हिडीओ काॅन्फरन्सद्वारे बोलत होते.

 

पुरूचि थैलैवार डॉ. एम जी रामचंद्रन  सेंट्रल रेल्वे स्थानकातून  केवाडीयाला जोडणारी गाडी लवकरच सुरू होत असल्याचे, नमूद करत पंतप्रधानांनी भारतरत्न एमजीआर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रध्दांजली वाहिली. श्री. मोदी यांनी  एमजीआर यां नी चित्रपटांच्या पडद्यावर आणि राजकीय व्यासपीठावर केलेल्या कामगिरीची प्रशंसा केली. एमजीआर यांचा राजकीय प्रवास हा गरीबांना समर्पित होता आणि पददलितांना  सन्मानपूर्वक जगता यावे यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले,याचा पंतप्रधानांनी उल्लेख केला.

पंतप्रधान म्हणाले, की आम्ही त्यांचे आदर्श पूर्णत्वास आणण्याचा प्रयत्न करत आहोत आणि चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानकाला  एमजीआर यांचे नाव देऊन देशाने दाखविलेल्या कृतज्ञतेचे स्मरण पंतप्रधानांनी यावेळी केले.

 

* * *

Jaydevi PS/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1689464) Visitor Counter : 123