आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतासाठी सर्वात महत्वाचा दिवस, जगातल्या सर्वात मोठ्या कोविड-19 लसीकरण अभियानाला आजपासून प्रारंभ

Posted On: 16 JAN 2021 7:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 जानेवारी 2021

 

जगातल्या सर्वात मोठ्या कोविड-19 लसीकरण मोहिमेला आज भारतात सुरवात झाली असून भारताच्या कोविड -19 विरोधातल्या लढ्यामधला आजचा दिवस महत्वाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी आज सकाळी 10.30  वाजता दुरदृष्य प्रणालीद्वारे या देशव्यापी लसीकरण मोहिमेचा प्रारंभ केला.

आजच्या तारखेला  2,11,033 पॉझिटिव्ह असून हे रुग्ण गृह विलगीकरणात अथवा रुग्णालयात देखरेखीखाली आहेत. बरे झालेल्यांच्या संख्येने 1 कोटीचा (1,01,79,715) आकडा पार केला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने सुधारत असून एकूण बरे झालेले आणि सक्रीय रुग्ण यातले अंतर आज 99,68,682 होते.

देशात सक्रीय रुग्ण संख्येत घट होत असल्याने 25 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशात 5,000 पेक्षा कमी सक्रीय रुग्णांची नोंद झाली आहे. या राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशात एकूण सक्रीय रुग्णांच्या केवळ 15% रुग्ण आहेत.

विविध राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातले सक्रीय रुग्ण प्रमाण असे आहे-

बरे झालेल्या पैकी 81.94% हे 10 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातले आहेत. केरळमध्ये एका दिवसात सर्वात जास्त म्हणजे 4,603 जन कोरोनामुक्त झाले. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 3,500 तर छत्तीसगड मध्ये 1009 जण बरे झाले.

नव्या रुग्णांपैकी 80.81% रुग्ण 8 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातले आहेत.

केरळमध्ये दैनंदिन सर्वात जास्त म्हणजे 5,624 नवे रुग्ण आढळले, महाराष्ट्रात 3,145 आणि पश्चिम बंगालमध्ये 708 नव्या रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात 175 मृत्यूंची नोंद झाली. यापैकी 69.14% सहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातले आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त 45 मृत्यूंची नोंद झाली. केरळ मध्ये 23 आणि पश्चिम बंगालमध्ये 16 दैनंदिन मृत्यूंची नोंद झाली.

 

S.Tupe/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1689151) Visitor Counter : 263