पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान 17 जानेवारी रोजी देशाच्या विविध प्रांतांतून स्टॅच्यू ऑफ युनिटीला अखंड रेल्वे जोडणी सुविधा देणाऱ्या आठ गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील


गुजरातमधील रेल्वे क्षेत्राशी संबंधित इतर अनेक प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत

Posted On: 15 JAN 2021 8:13PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशाच्या विविध प्रांतांना केवडियाला जोडणार्या आठ गाड्यांना  हिरवा झेंडा दाखवतील. या गाड्या स्टॅच्यू ऑफ युनिटीला अखंड जोडणी सुलभ करतील. या कार्यक्रमात पंतप्रधान गुजरातमधील रेल्वे क्षेत्राशी संबंधित इतर अनेक प्रकल्पांचे उद्घाटनही करणार आहेत. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय रेल्वेमंत्री उपस्थित राहणार आहेत.

दाभोई - चांदोड गेज रूपांतरित ब्रॉडगेज रेल्वे मार्ग, चांदोड - केवडिया नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग, नव्याने विद्युतीकरण केलेला प्रतापनगर - केवडिया विभाग आणि दाभोई, चांदोड आणि केवडिया या नवीन स्थानकांच्या इमारतींचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. स्थानिक वैशिष्ट्ये आणि आधुनिक प्रवासी सुविधांचा समावेश करून सौंदर्यदृष्ट्या या इमारतींची रचना केली आहे. केवडिया स्थानक हे हरित इमारत प्रमाणपत्र असलेले भारतातील पहिले रेल्वे स्थानक आहे. या प्रकल्पांद्वारे नजीकच्या आदिवासी भागातील विकास कार्यात भर पडेल, नर्मदा नदीच्या काठावर वसलेल्या महत्त्वाच्या धार्मिक आणि पुरातन तीर्थस्थळांना जोडण्यास मदत होईल, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय पर्यटन दोन्ही वाढतील, एकूणच या प्रदेशाच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी उत्प्रेरक म्हणून काम करेल. नवीन रोजगार आणि व्यवसाय संधी निर्माण करण्यात मदत होईल.

ज्या आठ गाड्या रवाना होणार आहेत त्या खालीलप्रमाणे:-

Sr.

Num

Train

Num

From

To

Train Name &  frequency

1

09103/04

Kevadiya

Varanasi

Mahamana Express (Weekly)

2

02927/28

Dadar

Kevadiya

Dadar-Kevadia Express (Daily)

3

09247/48

Ahmedabad

Kevadiya

Janshatabdi Express (Daily)

4

09145/46

Kevadiya

H. Nizamuddin

Nizamuddin – KevadiaSamparkKranti Express (Bi-Weekly).

5

09105/06

Kevadiya

Rewa

Kevadia – Rewa Express (Weekly)

6

09119/20

Chennai

Kevadiya

Chennai - Kevadia Express (Weekly)

7

09107/08

Pratapnagar

Kevadiya

MEMU train (Daily)

8

09109/10

Kevadiya

Pratapnagar

MEMU train (Daily)

 

 

जन शताब्दी एक्सप्रेसला अद्ययावत व्हिस्टा-डोम टूरिस्ट कोच देण्यात आला आहे जो आसमंताच्या विहंगम दृश्याची अनुभूती देईल.

 

M.Chopade/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1688897) Visitor Counter : 174