Posted On:
06 JAN 2021 7:17PM by PIB Mumbai
दिल्ली-मुंबई, 6 जानेवारी 2021
(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)
#Unite2FightCorona
#IndiaFightsCorona
मानवजातीचा फायदा करून देणारी भारतीय विज्ञानाची ही उत्तुंग भरारी आहे अशा शब्दात भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम. वेंकय्या नायडू यांनी दोन कोविड लसीं तात्काळ अधिकृत केल्यावर कौतुक केले. कोविड -19 चा प्रतिबंध करताना गत वर्षी देशाने दर्शविलेल्या राष्ट्रीय संकल्पांचे स्वागत करताना याच भावनेने या वर्षात लोकांपर्यंत लस पोहचविण्याचे आवाहन नायडू यांनी केले.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी @LinkedIn च्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत याविषयीचे काही विचार मांडले आहेत. गुणवत्तापूर्ण उत्पादने तयार करण्यावर आणि जगभरात त्यांच्यासाठी व्यापक ग्राहकवर्ग तयार करण्यावर त्यांनी भर दिला आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
पीएम केअर्स म्हणजेच ‘प्राइम मिनिस्टर सिटीझन असिस्टंस अँड रिलीफ इन इमरजन्सी सिच्युएशन’ न्यास निधी अंतर्गत जमा झालेले 201.58 कोटी रूपये सार्वजनिक आरोग्य सुविधेसाठी देशभरातल्या 162 पीएसए वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना अतिरिक्त हप्ता म्हणून वितरित करण्यात आले आहेत.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
पंतप्रधानांनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक यांच्या लसीला मंजुरी मिळाल्याबद्दल देशाचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधानांनी कोरोना योध्द्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, भारत आणि जपान यांच्यादरम्यान “निर्दिष्ट कुशल कामगार” या क्षेत्रातील भागीदारीसाठीच्या सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या करायला मजुरी देण्यात आली. हा करार लोकांचा एकमेकांशी संपर्क वाढविण्यासाठी तसेच भारतातून जपानला जाणाऱ्या कामगार आणि कुशल व्यावसायिकांच्या प्रवासाला उत्तेजन देण्यासाठी उपयुक्त ठरेल.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती :
देशभरात कोविड रुग्णांच्या प्रतिदिन मृत्यूंच्या संख्येत सातत्याने घसरण नोंदली जात आहे. गेले 12 दिवस रोज मृत्यू पावलेल्यांची संख्या सतत 300 पेक्षा कमी असलेली दिसून येत आहे.
संशयित रुग्णांचा शोध आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणे, मोठ्या प्रमाणात आणि अधिक जोशाने केलेल्या चाचण्या यांच्यासह प्रमाणित वैद्यकीय व्यवस्थापन नियमांचे पालन यांसारख्या परिणामकारक, प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्यामुळे मृत्यूंची संख्या कमी राखण्यात यश आले आहे.
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी या उपाययोजना परिणामकारकरीत्या राबविल्यामुळे रुग्णांचा लवकर शोध, त्यांचे तत्पर विलगीकरण आणि रुग्णालयातील कोविड बाधितांचे योग्य वेळी वैद्यकीय व्यवस्थापन शक्य झाले.
गेल्या सात दिवसांत दर एक दशलक्ष लोकसंख्येमागे एका मृत्यूची नोंद झाली आहे. हे नवे यश म्हणजे कोविडशी संबंधित गोष्टींचे परिणामकारक व्यवस्थापन आणि केंद्र सरकारच्या प्रतिसादात्मक धोरण यांचा सबळ पुरावाच आहे.
आणखी एका स्तरावर सफलता नोंदवत भारताच्या सक्रीय कोविड रुग्णांच्या संख्येतील घसरणीचा कल कायम आहे. देशातील सक्रीय कोविड रुग्णांची संख्या सध्या 2,27,546 आहे, आतापर्यंतच्या एकूण कोविड ग्रस्तांची संख्या लक्षात घेता आता देशात 2.2.% हूनही कमी म्हणजे फक्त 2.19% रुग्ण कोविड सक्रीय आहेत.
प्रतिदिन कोविडमधून बरे होणाऱ्यांची संख्या रोज बाधित होणाऱ्या रुग्णांपेक्षा सातत्याने जास्त असल्यामुळे एकूण सक्रीय रुग्णांच्या संख्येत खात्रीशीर घट दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत 21,314 कोविड ग्रस्त रुग्ण बरे झाले. या काळात एकूण कोविड ग्रस्तांची संख्या 3,490 ने कमी झाली.
गेल्या काही दिवसांत, भारतातील दैनंदिन कोविड बाधितांची संख्या सतत 20,000 पेक्षा कमी नोंदली गेली आहे. गेल्या 24 तासांत 18,088 नव्या कोविड ग्रस्तांची नोंद झाली.
गेल्या 7 दिवसांत भारतातील एक दशलक्ष लोकसंख्येमागे 96 नव्या रुग्णांची नोंद झाली. ब्राझील,रशिया,फ्रांस,इटली, अमेरिका आणि ब्रिटन या देशांमध्ये हे प्रमाण कितीतरी जास्त आहे.
भारतातील एकूण कोविड मुक्तांची संख्या 1 कोटीच्या जवळपास पोहोचली आहे. एकूण कोविड मुक्तांची संख्या आज 99,97,272 इतकी आहे. प्रतिदिन कोविडमधून बरे होणाऱ्यांची संख्या रोज बाधित होणाऱ्या रुग्णांपेक्षा सातत्याने जास्त असल्यामुळे रोगमुक्तीचा दर 96.36% वर पोहोचला आहे.
नव्याने रोगमुक्त झालेल्या कोविड बाधितांपैकी 76.48% रुग्ण देशातील 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत एकवटलेले आहेत.
देशभराचा विचार करता, एका दिवसात कोविडमुक्त झालेल्या 4,922 रुग्णांसह केरळमध्ये सर्वाधिक व्यक्ती बऱ्या झाल्या. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 2,828 तर छत्तीसगडमध्ये 1,651 रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.
नव्याने नोंद झालेल्या एकूण कोविड बाधितांपैकी 79.05% रुग्ण देशातील 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील आहेत.
केरळमध्ये गेल्या 24 तासांत सर्वात जास्त म्हणजे 5,615 व्यक्ती नव्याने कोविडग्रस्त झाल्या. काल महाराष्ट्रात 3,160 तर छत्तीसगडमध्ये 1,021 नव्या कोविडग्रस्तांची नोंद झाली.
कोविडमुळे देशात गेल्या 24 तासांत मृत्यू पावलेल्या 264 रुग्णांपैकी 73.48% रुग्ण देशातील 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील आहेत.
मृत्युमुखी पडलेल्यांपैकी 24.24% म्हणजे 64 रुग्ण महाराष्ट्रातील होते. छत्तीसगड राज्यात 25 तर केरळमध्ये 24 रुग्णांचा मृत्यू झाला.
ब्रिटनमध्ये आढळलेल्या, कोविड विषाणूच्या नव्या उत्परिवर्तित जातीने बाधित झालेले 71 रुग्ण आता देशात नोंदले गेले आहेत.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
इतर अपडेट्स:
केंद्रीय औषध मानक नियंत्रण परीषदेच्या (CDSCO) विषयतज्ञांच्या समितीची दिनांक 1आणि 2 जानेवारी 2021 रोजी बैठक झाली. त्यांनी मेसर्स सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि मेसर्स भारत बायोटेक यांच्या कोविड-19 विषाणूच्या लसीला मर्यादित आपत्कालीन मंजूरी देण्याच्या प्रस्तावासंदर्भात त्याचबरोबर मेसर्स कॅडिला हेल्थकेअर लिमिटेडला तिसऱ्या टप्प्यातील क्लीनिकल ट्रायल्स घेण्यासाठी मंजूरी देण्याबाबत शिफारशी सुचविल्या.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 125 जिल्ह्यांतील 286 लसीकरण केंद्रांवर एक देशव्यापी मोहीम राबवून लस देण्यासंबंधीचे रंगीत तालीमीसारखे सरावसत्र घेण्यात आले. प्रत्येक जिल्ह्याने तीन किंवा अधिक केंद्रांवर रंगीत तालीम घेतली असून यामध्ये एक सार्वजनिक आरोग्य सेवाकेंद्र (जिल्हा रुग्णालय/ वैद्यकीय महाविद्यालय) खासगी आरोग्य केंद्र आणि ग्रामीण किंवा शहरी आरोग्यकेंद्र यांचा समावेश होता. कार्यान्वयन आणि रंगीत तालीम घेण्यासाठी सर्व राज्य आणि जिल्हा अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
डिसेंबर 2020 च्या महिन्यात संकलित केलेला एकूण जीएसटी महसूल 1,15,174 कोटी रुपये आहे. त्यापैकी सीजीएसटी 21,365 कोटी रुपये आहे, एसजीएसटी 27,804 कोटी रुपये, आयजीएसटी 57,426 कोटी रुपये आहे (वस्तूंच्या आयातीवर जमा झालेल्या, 27,050 कोटी रुपयांसह ) आणि अधिभार 8,579 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर संकलित 971 कोटींचा समावेश) आहे. 31 डिसेंबर 2020 पर्यंत नोव्हेंबर महिन्यात दाखल झालेल्या जीएसटीआर -3 बी विवरणपत्रांची एकूण संख्या 87 लाख आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्र अपडेट्स
महाराष्ट्रात मंगळवारपर्यंत कोविडचे 18,50,189 रुग्ण बरे झाले असून राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 94.87 टक्के झाला आहे. राज्यात मंगळवारी 3160 नवीन रुग्णांची नोंद झाली तर 64 रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबई शहरात काल 1085 नवीन रुग्ण आढळले असून 22 जणांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे तर पुण्यात 635 नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली असून 10 जण दगावले आहेत. राज्यात या आठवड्यात 8 जणांना कोविडच्या नव्या प्रकाराची बाधा झाली आहे, यापैकी 5 जण मुंबईचे असून बाकी तिघे पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदरचे आहेत. इतर राज्यामार्फत परदेशातून येणाऱ्या प्रवाश्यांना विभक्त ठेवण्यासंदर्भात केंद्राला विनंती करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सोमवारी सांगितले.
दरम्यान, शनिवारी (2 जानेवारी, 2020) राज्यातील पुणे, जालना, नंदुरबार आणि नागपूर या चारही जिल्ह्यांमध्ये कोरोना लसीची यशस्वी ड्राय रन घेण्यात आली. येत्या शुक्रवारी (8 जानेवारी 2020 ) सर्व 36 जिल्ह्यात आणखी एक ड्राय रन राबविण्यात येणार आहे.
FACT CHECK
****
R.Tidke/P.Kor