अर्थ मंत्रालय

जीएसटी लागू झाल्यापासून डिसेंबर 2020 मधील जीएसटी महसूल संकलनाने उच्चांकी पातळी नोंदवली

Posted On: 01 JAN 2021 6:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 जानेवारी 2021

 

डिसेंबर 2020 च्या महिन्यात संकलित केलेला एकूण जीएसटी महसूल 1,15,174  कोटी रुपये आहे, त्यापैकी सीजीएसटी 21,365 कोटी रुपये आहे, एसजीएसटी 27,804 कोटी रुपये, आयजीएसटी 57,426 कोटी रुपये आहे (वस्तूंच्या आयातीवर जमा झालेल्या, 27,050 कोटी रुपयांसह ) आणि अधिभार  8,579 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर संकलित 971 कोटींचा समावेश) आहे. 31 डिसेंबर 2020 पर्यंत नोव्हेंबर महिन्यात दाखल झालेल्या जीएसटीआर -3 बी विवरणपत्रांची एकूण संख्या 87 लाख आहे.

सरकारने नियमित तडजोड  म्हणून आयजीएसटीमधून  23,276 कोटी रुपये सीजीएसटीला आणि 17,681 कोटी रुपये एसजीएसटीला दिले आहेत.  डिसेंबर 2020 महिन्यात नियमित निपटाऱ्यानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी मिळविलेला एकूण महसूल सीजीएसटीसाठी, 44,641 कोटी रुपये आणि एसजीएसटीसाठी 45,485 कोटी रुपये आहे.

जीएसटी महसुलात सुधारणेचा अलिकडचा कल पाहता, डिसेंबर 2020 महिन्यातील महसूल मागील वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसूलपेक्षा 12% जास्त आहे. या महिन्यात वस्तूंच्या आयातीमधून मिळणारा महसूल 27% जास्त होता आणि देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) मिळणारा महसूल 8% जास्त होता,जीएसटी लागू झाल्यापासून डिसेंबर 2020  मधील जीएसटीचा महसूल सर्वाधिक आहे  आणि प्रथमच 1.15  लाख कोटींचा आकडा पार केला आहे.  आतापर्यंतचे सर्वाधिक जीएसटी संकलन  एप्रिल 2019  मध्ये 1,13,866  कोटी रुपये होते.  एप्रिल महिन्याचा महसूल साधारणत: जास्त असतो कारण ते मार्चच्या विवरणपत्रांशी संबंधित असतात. डिसेंबर 2020 मधील महसूल मागील महिन्याच्या महसुलापेक्षा  1,04.963 कोटीपेक्षा जास्त आहे. गेल्या 21 महिन्यांतील मासिक महसुलातली  ही सर्वाधिक वाढ आहे. महामारीनंतर वेगवान आर्थिक भरारी आणि जीएसटी चुकवणाऱ्यांविरोधात  देशव्यापी मोहिमेचा एकत्रित परिणाम यामुळे करपालन  सुधारले आहे.

खाली दिलेल्या तक्त्यामध्ये चालू वर्षात मासिक जीएसटी संकलनातील  कल दाखवला आहे. डिसेंबर 2019 च्या तुलनेत डिसेंबर 2020  महिन्यात प्रत्येक राज्यात जीएसटीची संकलनाची राज्य-निहाय आकडेवारी दाखवली आहे .

State-wise growth of GST Revenues during December 2020[1]

 

State

Dec-19

Dec-20

Growth

1

Jammu and Kashmir

409

318

-22%

2

Himachal Pradesh

699

670

-4%

3

Punjab

1,290

1,353

5%

4

Chandigarh

168

158

-6%

5

Uttarakhand

1,213

1,246

3%

6

Haryana

5,365

5,747

7%

7

Delhi

3,698

3,451

-7%

8

Rajasthan

2,713

3,135

16%

9

Uttar Pradesh

5,489

5,937

8%

10

Bihar

1,016

1,067

5%

11

Sikkim

214

225

5%

12

Arunachal Pradesh

58

46

-22%

13

Nagaland

31

38

23%

14

Manipur

44

41

-8%

15

Mizoram

21

25

21%

16

Tripura

59

74

25%

17

Meghalaya

123

106

-14%

18

Assam

991

984

-1%

19

West Bengal

3,748

4,114

10%

20

Jharkhand

1,943

2,150

11%

21

Odisha

2,383

2,860

20%

22

Chhattisgarh

2,136

2,349

10%

23

Madhya Pradesh

2,434

2,615

7%

24

Gujarat

6,621

7,469

13%

25

Daman and Diu

94

4

-96%

26

Dadra and Nagar Haveli

154

259

68%

27

Maharashtra

16,530

17,699

7%

29

Karnataka

6,886

7,459

8%

30

Goa

363

342

-6%

31

Lakshadweep

1

1

-32%

32

Kerala

1,651

1,776

8%

33

Tamil Nadu

6,422

6,905

8%

34

Puducherry

165

159

-4%

35

Andaman and Nicobar Islands

30

22

-26%

36

Telangana

3,420

3,543

4%

37

Andhra Pradesh

2,265

2,581

14%

38

Laddakh

0

8

 

97

Other Territory

118

88

-25%

99

Center Jurisdiction

75

127

68%

Grand Total

81,042

87,153

8%

 

 

 

 

 

S.Tupe/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com




(Release ID: 1685418) Visitor Counter : 357