आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड -19 लसीकरणासाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 125 जिल्ह्यांत 286 केंद्रांवर रंगीत तालीम


लस देणाऱ्या सुमारे 1,14,100 जणांना प्रशिक्षण

75 लाख लाभार्थ्यांची को-विन सॉफ्टवेअरवर नोंदणी

लस देण्याविषयीच्या बारीकसारीक तपशिलांकडे लक्ष

Posted On: 02 JAN 2021 11:28PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 जानेवारी 2021

 

सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 125 जिल्ह्यांतील 286 लसीकरण केंद्रांवर आज एक देशव्यापी मोहीम राबवून लस देण्यासंबंधीचे रंगीत तालीमीसारखे  सरावसत्र घेण्यात आले. प्रत्येक जिल्ह्याने तीन किंवा अधिक केंद्रांवर रंगीत तालीम घेतली असून यामध्ये एक सार्वजनिक आरोग्य सेवाकेंद्र (जिल्हा रुग्णालय/ वैद्यकीय महाविद्यालय) खासगी आरोग्य केंद्र आणि ग्रामीण किंवा शहरी आरोग्यकेंद्र यांचा समावेश होता. कार्यान्वयन आणि रंगीत तालीम घेण्यासाठी सर्व राज्य आणि जिल्हा अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. आरोग्य यंत्रणेत कोविड-19 लस देण्यासाठी आखलेल्या प्रणालीची तपासणी करण्याच्या उद्देशाने ही रंगीत तालीम घेण्यात आली. तसेच गट, जिल्हा आणि राज्य पातळीवर नियोजन,अंमलबजावणी आणि अहवाल तयार करण्याबाबत को-विन अप्लिकेशनची व्यवहार्यता तपासण्याचेही उद्दिष्ट यावेळी ठेवण्यात आले होते. राज्य, जिल्हा, गट आणि रुग्णालय पातळीवरील अधिकाऱ्यांना कोरोना लसीच्या सर्व मुद्द्यांचा परिचय करून देण्यासाठीही आजची तालीम घेण्यात आली.

देशपातळीवर राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी सकाळी 9:00 वाजल्यापासून विनाव्यत्यय रंगीत तालीम सुरु केली. लाभार्थ्याची माहिती भरणे, लसीकरण केंद्र नेमून देणे आणि सूक्ष्म नियोजन, लस वितरण, केंद्र व्यवस्थापन, अहवाल तयार करण्याची पद्धत अशा निरनिराळ्या कृतींचा सराव आजच्या दिवसात करण्यात आला. खऱ्याखुऱ्या लसीकरण दिवसाचे जवळपास हुबेहूब प्रात्यक्षिक करून बघण्यासाठी आज चांगल्या पद्धतीने तालीम करण्यात आली. लसीकरणानंतरचे संभाव्य दुष्परिणाम हाताळण्याची तयारी आणि संबंधित कॉल सेन्टर्सचे कार्यान्वयनही आज तपासले गेले. या रंगीत तालमीचे पर्यवेक्षण जिल्हाधिकाऱ्यांनी केले. दिवसभरात आलेल्या अडचणी आणि आव्हानांबद्दल चर्चा करण्यासाठी जिल्हा आणि राज्य पातळीवर बैठका होऊन रंगीत तालमीची सांगता झाली. कार्यान्वयन आणि को-विन सॉफ्टवेअरच्या वापरासह रंगीत तालमीचे यशस्वी आयोजन झाल्याबद्दल राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांनी समाधान व्यक्त केले.

को-विन सॉफ्टवेअरची निर्मिती, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसीचा रिअल टाईम साठा, साठ्यासाठी लागणारे तापमान आणि कोविड-19 लसीकरणाच्या लाभार्थ्यांचा वैयक्तिक मागोवा  घेण्यासाठी केली आहे. हे सॉफ्टवेअर पूर्व-नोंदणीकृत लाभार्थ्यांसाठी स्वयंचलित वाटपाद्वारे सर्व स्तरातील कार्यक्रम व्यवस्थापकांना मदत करेल. लसीकरण वेळापत्रक पूर्ण झाल्यावर  त्याचे सत्यापन आणि डिजिटल प्रमाणपत्र तयार केले जाईल. को-विन सॉफ्टवेअरवर आतापर्यंत 75 लाख लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे.

देशभरात कोविड-19 लसीचा शेवटच्या घटकापर्यंत योग्यरित्या पुरवठा करण्यासाठी शीत साखळी सुविधायुक्त तापमान नियंत्रित वातावरण आवश्यक आहे. कोविड लसीकरणासाठी पुरेशा सुया (सिरिंज) आणि इतर साहित्याची निश्चिती केली गेली आहे. सुमारे 1,14,100 जणांना लसीकरणासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. यात कार्यस्थळावर लाभार्थ्यांची ओळख, लसीकरण, शीत साखळी आणि लॉजिस्टीक व्यवस्थापन, जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन, एईएफआय व्यवस्थापन आणि को-विन सॉफ्टवेअरवर माहिती अपलोड करणे याचा समावेश आहे.  

संपूर्ण प्रक्रियात्मक नियोजन आणि माहिती-तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मची चाचणी आंध्र प्रदेश, आसाम, पंजाब आणि गुजरात येथे 28 आणि 29 डिसेंबर 20 रोजी करण्यात आली, या आधारावर माहिती-तंत्रज्ञान प्रणालीत काही सुक्ष्म बदल करण्यात आले आहेत.   

रंगीत तालीम करण्यात आलेल्या जिल्ह्यांचा आणि कार्यस्थळांचा तपशीलवार माहितीसाठी येथे क्लिक करा

 

* * *

GC/JW/SRT/DR

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1685720) Visitor Counter : 299