पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक यांच्या लसीला मंजुरी मिळाल्याबद्दल देशाचे केले अभिनंदन
कोरोना योध्द्यांबद्दल केली कृतज्ञता व्यक्त
प्रविष्टि तिथि:
03 JAN 2021 1:42PM by PIB Mumbai
आपल्या ट्विट संदेशांच्या मालिकेत पंतप्रधान म्हणाले,
"डीसीजीआयने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक यांना दिलेली मान्यता हे निर्णायक वळण असून कोविड विरुद्ध लढा मजबूत करणारे आहे"
"आपल्या सर्व मेहनती शास्त्रज्ञांचे आणि नवनिर्मिती करणाऱ्यांचे अभिनंदन"
आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आलेल्या दोन लसी देशात तयार झाल्या याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल!आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्याची उत्सुकता आपल्या सर्व शास्त्रज्ञांना आहे. या आत्मनिर्भर भारताचा पाया काळजी आणि करुणा आहे, हे यातून निदर्शनास येते.
आम्ही पुन्हा आपल्या डॉक्टर्स,वैद्यकीय कर्मचारी, शास्त्रज्ञ, पोलिस कर्मचारी, स्वछता कर्मचारी यांनी प्रतिकूल परिस्थितीतही केलेल्या महत्वपूर्ण कार्याचा आणि सर्व कोविड योध्द्यांबद्दलच्या कृतज्ञतेचा पुनर्रुच्चार करतो.अनेकांचे जीव वाचविल्याबद्दल आम्ही त्यांचे कायमचे ऋणी आहोत.
M.Chopade/S.Patgoankar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1685777)
आगंतुक पटल : 364
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam