आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारतामध्ये सक्रिय रूग्णसंख्येत सातत्याने घट; कोरोनामुक्त होण्याच्या दैनंदिन प्रमाणात वाढ
गेल्या 24 तासांमध्ये 16,375 नवीन रूग्ण, दररोजच्या नवीन सक्रिय रूग्णसंख्येत सातत्याने घट
एकूण 58 जण कोरोनाच्या नवीन प्रकाराने संक्रमित
Posted On:
05 JAN 2021 1:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जानेवारी 2021
भारतामध्ये सक्रिय रूग्णसंख्येत सातत्याने घट नोंदविली जात आहे, देशात आज 2,31,036 कोरोनाचे रूग्ण आहेत. हे प्रमाण एकूण रूग्णांच्या 2.23 टक्के आहे.
गेल्या 39 दिवसांमध्ये कोरोनामुक्त होणा-यांची संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 29,091जण कोरोनामुक्त झाले आहेत तर भारतामध्ये 16,375 नवीन रूग्ण नोंदवले गेले आहेत. देशात गेल्या 24 तासांमध्ये 8,96,236 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. गेल्या 24 तासात कोरोना रूग्णनोंदीमध्ये 12,917 घट झाल्याचे दिसून आले आहे.
भारतामध्ये आता कोरोना रूग्णांचा रोजचा आकडाही कमी होताना दिसून येत आहे.
यूकेमध्ये पहिल्यांदा सापडलेल्या कोरोनामधील नवीन प्रकारच्या विषाणूची बाधा झालेल्या रूग्णांची भारतातील संख्या आता 58 झाली आहे.
पुण्याच्या ‘एनआयव्ही’ संस्थेकडे तपासणीसाठी आलेल्या नमुन्यातील नवीन 20 रूग्णांना या विषाणूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
एनसीबीएस इनस्टेम बंगलुरू, सीडीएफडी हैद्राबाद, आयएलएस भुवनेश्वर आणि एनसीसीएस, पुणे येथे नवीन प्रकारच्या विषाणूची बाधा झालेला एकही रूग्ण आढळला नाही.
No.
|
Institute/Lab
|
Under
|
Persons detected with new COVID strain
|
1
|
NCDC New Delhi
|
MoHFW
|
8
|
2
|
IGIB New Delhi
|
CSIR
|
11
|
3
|
NIBMG Kalyani (Kolkata)
|
DBT
|
1
|
4
|
NIV Pune
|
ICMR
|
25
|
5
|
CCMB Hyderabad
|
CSIR
|
3
|
6
|
NIMHANS Bengaluru
|
MoHFW
|
10
|
TOTAL
|
58
|
देशातल्या 10 प्रयोगशाळांमध्ये नवीन विषाणूच्या जनुकाची चाचणी करण्याची सुविधा आहे. यामध्ये एनआयबीएमजी- कोलकाता, आयएलएस - भुवनेश्वर, एनसीसीएस- पुणे, सीडीएफडी- हैद्राबाद, इनस्टेम- बंगलुरू, एनआयएमएचएएनएस - बंगलुरू, आयजीआयबी -दिल्ली, एनसीडीसी’- दिल्ली या संस्थांचा त्यात समावेश आहे.
या नवीन कोरोना विषाणूमुळे बाधित झालेल्या रूग्णांना विलगीकरणामध्ये ठेवले असून त्या त्या राज्यांच्यावतीने आरोग्य दक्षता सुविधा देण्यात येत आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना अलग ठेवण्यात आले आहे. तसेच त्यांचे सहप्रवासी, कुटुंबिय आणि इतरांच्या सर्वंकष संपर्कांचा शोध घेतला जात आहे. इतर वेगळ्या प्रकारच्या विषाणूंमुळे संसर्ग होतो आहे का, याचीही तपासणी केली जात आहे.
या संपूर्ण परिस्थितीकडे आरोग्य विभागाचे संबंधित अतिशय बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तसेच राज्यांनी अधिक काळजी घ्यावी यासाठी त्यांना आवश्यक असणा-या सुविधा देण्यात येत आहेत. यामध्ये पाळत वाढविणे, प्रतिबंधात्मक उपाय योजणे, चाचणी करून त्याचे नमूने आयएनएसएसीओजी प्रयोगशाळांना पाठवणे, यासाठी राज्यांना सर्वतोपरी मदत दिली जात आहे.
भारतामध्ये कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा आता 1 कोटीपर्यंत पोहोचत आहे. आत्तापर्यंत 99.75 लाख (99,75,958) जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 96.32 टक्के झाले आहे.
गेल्या 24 तासांमध्ये 29,091 जण कोरोनामुक्त झाले.
दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात कोरोनामुक्त होणा-यांचे प्रमाण 82.62 टक्के आहे.
महाराष्ट्रात एका दिवसात सर्वात जास्त म्हणजे 10,362 जण कोरोनामुक्त झाले. त्याखालोखाल केरळमध्ये 5,145 जण बरे झाले. तर छत्तीसगडमध्ये 1,349 जण कोरोनामुक्त झाल्याची नोंद आहे.
नव्याने संक्रमित झालेल्या रूग्णांपैकी दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 80.05 टक्के रूग्ण आहेत.
गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 4,875 जणांना कोरोनाची बाधा झाली. केरळमध्ये 3,021 नवीन रूग्ण सापडले तर छत्तीसगडमध्ये 1,147 जणांना कोरोना झाला.
गेल्या 24 तासांमध्ये कोरोनामुळे देशात 201 जणांचा मृत्यू झाला. यापैकी 70.15 टक्के रूग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातले आहेत.
महाराष्ट्रात कोरोनामुळे गेल्या चोवीस तासांत 29 जण मृत्यूमुखी पडले, हे प्रमाण 14.42 टक्के आहे. पश्चिम बंगाल आणि पंजाब या राज्यांमध्ये अनुक्रमे 25 आणि 24 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. हे प्रमाण 12.44 आणि 11.94 टक्के आहे.
* * *
U.Ujgare/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1686223)
Visitor Counter : 256
Read this release in:
Tamil
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Malayalam