पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान 31 डिसेंबर रोजी राजकोट येथे एम्सची पायाभरणी करणार
Posted On:
29 DEC 2020 8:11PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुजरातच्या राजकोट येथे एम्सची पायाभरणी करणार आहेत. या वेळी गुजरातचे राज्यपाल, गुजरातचे मुख्यमंत्री, केंद्रीय आरोग्यमंत्री आणि केंद्रीय आरोग्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत.
या प्रकल्पासाठी 201 एकर जागा देण्यात आली आहे. अंदाजे 1195 कोटी रुपये खर्चून ते बांधण्यात येईल आणि 2022 च्या मध्यापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. अत्याधुनिक 750 खाटांच्या रुग्णालयात 30 बेडचा आयुष विभाग असेल. त्यात 125 एमबीबीएस जागा आणि नर्सिंगसाठी 60 जागा असतील.
M.Iyengar/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1684483)
Visitor Counter : 204
Read this release in:
Hindi
,
Assamese
,
English
,
Urdu
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam