आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताने एक महत्त्वाचा टप्पा गाठला- नवीन रुग्णांची दैनंदिन संख्या 16,500 पेक्षा कमी  नोंदली गेली; 187 दिवसातील सर्वात कमी संख्या


कोविड रोगातून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या  98 लाखांच्या पुढे गेली

Posted On: 29 DEC 2020 1:11PM by PIB Mumbai

 

संपूर्ण सरकार आणि संपूर्ण समाज’ या दृष्टिकोनावर आधारीत सातत्यपूर्ण, सक्रिय आणि टप्प्याटप्प्याच्या रणनीतीसह, भारताने आज जागतिक महामारीच्या विरोधातील  आपल्या लढाईत महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. नवीन रुग्णांच्या दैनंदिन संख्येने आज नीचांकी  पातळी गाठली आहे.

187 दिवसानंतर गेल्या 24 तासांत राष्ट्रीय संख्येत 16,500 पेक्षा कमी नवीन रुग्णांची   (16,432) भर पडली. 25 जून 2020 रोजी 16,922 नवीन रुग्ण आढळले होते.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001AUWW.jpg

भारतातील उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या आज 2,68,581 पर्यंत खाली आली.  एकूण बाधित रुग्णांमध्ये उपचार सुरु असलेल्या रुग्णांचे प्रमाण 2.63 % पर्यंत कमी झाले आहे.

गेल्या 24 तासांत एकूण उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत  8,720 ने घट झाली आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002R2ZW.jpg

बरे होणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या आणि दररोज आढळणाऱ्या नवीन रुग्णांच्या संख्येतील घट यामुळे भारतातील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या  1 कोटीच्या जवळ येत आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 98 लाखांच्या (98,07,569) पुढे गेली आहे. यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर 95.92 % झाला आहे. बरे झालेले रुग्ण आणि उपचाराधीन रुग्ण यांच्यातील अंतर वाढत आहे आणि सध्या ते 95,38,988 आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0030YWR.jpg

गेल्या 24 तासांत 24,900 रुग्ण बरे झाले आहेत.

बरे झालेल्या नवीन रुग्णांपैकी 77.66 % रुग्ण 10 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहेत.

महाराष्ट्राने काल 4,501 एवढी एका दिवसातील सर्वाधिक बरे झालेल्या रुग्णांची संख्या नोंदवली. केरळमध्ये काल 4,172 रुग्ण बरे झाले. छत्तीसगडमध्ये काल आणखी 1,901 रुग्ण बरे झाले.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004NY9P.jpg

नवीन रुग्णांपैकी  78.16% रुग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आढळले आहेत.

केरळमध्ये गेल्या चोवीस तासांत सर्वाधिक 3,047 नवे  रुग्ण आढळले. महाराष्ट्रात 2,498 नवीन रुग्ण तर छत्तीसगडमध्ये 1,188  नवीन रुग्ण काल आढळले.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image005Y4RZ.jpg

गेल्या 24  तासांत नोंद झालेल्या 252 मृत्यूंपैकी 77.38 % मृत्यू दहा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये झाले आहेत.

महाराष्ट्रात काल 19.84 टक्के म्हणजे 50 मृत्यूंची नोंद झाली. पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमध्ये काल अनुक्रमे 27 आणि 26  मृत्यूची नोंद झाली.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image006L2DG.jpg

U.Ujgare/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1684326) Visitor Counter : 144