पंतप्रधान कार्यालय

भारत-अमेरिकेच्या धोरणात्मक भागीदारीवरील वाढत्या सहमतीला मान्यता- लिजन ऑफ मेरिट पुरस्कार स्वीकारल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी

Posted On: 22 DEC 2020 10:33PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, अमेरिकन सरकारने त्यांना लिजन ऑफ मेरिट पुरस्कार देऊन सन्मानित केल्यामुळे त्यांना मनापासून गौरवान्वित झाल्यासारखे वाटत आहे.

ट्विटर संदेशांच्या मालिकेत त्यांनी म्हंटले आहे की, “ “अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लिजन ऑफ मेरिट पुरस्कार देऊन सन्मानित केल्यामुळे मला मनापासून गौरवान्वित झाल्यासारखे वाटत आहे. द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी भारत आणि अमेरिकेच्या लोकांच्या प्रयत्नांना यामुळे मान्यता मिळाली आहे, हे भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारीबद्दल उभय देशांमधील द्विपक्षीय सहमती दर्शवते.

एकविसाव्या शतकात अभूतपूर्व आव्हाने तसेच संधी दोन्ही आहेत. संपूर्ण मानवतेच्या हितासाठी जागतिक नेतृत्व प्रदान करण्यासाठी आपल्या लोकांच्या अद्वितीय सामर्थ्याच्या विपुल क्षमतेचा भारत-अमेरिका संबंधांना  फायदा होऊ शकतो.

भारताच्या 1.3 अब्ज जनतेच्या वतीने, भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ करण्यासाठी अमेरिकन सरकार आणि उभय देशांतील इतर सर्व भागधारकांसोबत काम सुरू ठेवण्याचा माझ्या सरकारचा दृढ निश्चय आणि बांधिलकीचा मी पुनरुच्चार करतो. "

 

 

 

M.Chopade/S.Mhatre/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1682807) Visitor Counter : 178