आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

सक्रीय कोविड बाधितांच्या संख्येतील घसरणीचा कल कायम; 161 दिवसांनंतर ही संख्या 3 लाख 3 हजार इतकी कमी


प्रतिदिन कोविडमुक्त होणाऱ्यांची संख्या रोज नव्याने बाधित होणाऱ्यांपेक्षा गेले सलग 24 दिवस कमी

Posted On: 21 DEC 2020 2:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 डिसेंबर 2020 


भारतातील सक्रीय कोविड बाधितांच्या संख्येत घसरण होत असून आज 3 लाखांपेक्षा कमी म्हणजे 3,03,639 रुग्ण बाधित आहेत. गेल्या 161 दिवसांच्या कालावधीनंतर प्रथमच रुग्णसंख्येने आज नीचांक गाठला आहे. याआधी, गेल्या 13 जुलै 2020 रोजी 3 लाख 1 हजार 609 सक्रीय कोविड रुग्णांची नोंद झाली होती.

भारतात सध्या सक्रीय असलेल्या रुग्णांची संख्या देशाच्या एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या फक्त 3.02% इतकी आहे. नव्याने बऱ्या झालेल्या रुग्णांमुळे एकूण सक्रीय कोविड बाधितांच्या संख्येत 1,705 ने घट झाली आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0012K19.jpg

देशात नव्याने कोविड मुक्त होणाऱ्या व्यक्तींची संख्या गेले 24 दिवस सातत्याने रोज नोंदल्या जाणाऱ्या कोविड बाधीतांपेक्षा कमी आहे. देशात गेल्या 24 तासांच्या कालावधीत 24,337 नव्या कोविड बाधितांची नोंद झाली, या कालावधीत 25,709 जणांना रोगमुक्त झाल्यामुळे  रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. 

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002YB4E.jpg

अधिकाधिक व्यक्ती कोविड संसर्गातून बऱ्या होत असल्याने रोगमुक्तीचा दर 95.53% वर पोहोचला आहे.

कोविड संसर्गातून पूर्ण बरे झालेल्यांची एकूण संख्या आता 96,06,111 झाली आहे. ही संख्या जगभरात सर्वाधिक आहे. रोगमुक्त होणारे आणि नव्याने बाधित यांच्या संख्येतील तफावत दिवसेंदिवस वेगाने वाढत असून सध्या ही तफावत 93,02,472 इतकी आहे.

नव्याने रोगमुक्त झालेल्या कोविड बाधितांपैकी 71.61% रुग्ण देशातील 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत एकवटलेले आहेत.
केरळ राज्यात एका दिवसांत रोगमुक्त झालेल्यांची संख्या सर्वाधिक म्हणजे 4,471 इतकी असून पश्चिम बंगाल मध्ये 2,627 तर महाराष्ट्रात 2,064 व्यक्ती रोगमुक्त झाल्याची नोंद झाली आहे. 

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image00367A2.jpg

नोंद झालेल्या नव्या कोविड बाधितांपैकी 79.20% रुग्ण देशातील 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील आहेत.

केरळ राज्यात एका दिवसात सर्वात जास्त म्हणजे 5,711 व्यक्ती नव्याने कोविड बाधित झाल्या, त्याखालोखाल महाराष्ट्रात 3,811 नव्या रुग्णांची नोंद झाली. पश्चिम बंगालमध्ये 1,978 नवे कोविडबाधित नोंदले गेले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004Z9IY.jpg

देशभरात गेल्या 24 तासांत 333 कोविड रुग्णांचा मृत्यू झाला. 

त्यापैकी 81.38% रुग्ण देशातील 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील होते. महाराष्ट्रातील सर्वात जास्त म्हणजे 98 रुग्णांचा मृत्यू झाला तर पश्चिम बंगालमध्ये 40 रुग्ण आणि केरळमध्ये 30 रुग्ण मृत्युमुखी पडले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image005DLBY.jpg

आंतरराष्ट्रीय पातळीवर विचार करता, कोविडमुळे जीव गमावणाऱ्या रुग्णांची संख्या कमी असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. सध्या भारतात हे प्रमाण 105.7 प्रती दशलक्ष इतके आहे.

योग्य उद्दिष्ट ठेवून केलेल्या चाचण्या, जलद शोध आणि ओळख, वेळेवर विलगीकरण, रुग्णालयात दाखल करण्यातील तत्परता आणि प्रमाणित उपचार पद्धतीचा अवलंब यासारख्या लक्ष्याधारित उपायांमुळे कोविडमुळे होणाऱ्या प्रतिदिन मृत्यूंची संख्या निरंतर 400 च्या खाली राखणे शक्य झाले आहे. 

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image006ZNLO.jpg

* * *

U.Ujgare/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1682361) Visitor Counter : 127