आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतात कोरोनातून बरे झालेल्यांच्या संख्येने 95 लाखाचा टप्पा केला पार


रुग्ण बरे होण्याचा 95.40% हा दर जगातल्या सर्वोच्च दरापैकी एक

सक्रीय रुग्ण संख्येत घट होऊन रुग्ण संख्या 3.13 लाख

Posted On: 18 DEC 2020 12:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 डिसेंबर 2020

 

कोरोनाच्या जागतिक महामारी विरोधातल्या लढ्यात भारताने महत्वाचा आणखी एक टप्पा गाठला आहे. भारतात रुग्ण बरे होण्याचा कल जारी राहिला असून कोरोनातून बरे झालेल्यांच्या एकूण  संख्येने 95 लाखाचा (95,20,827) महत्वाचा टप्पा केला आहे. सक्रीय रुग्ण आणि बरे झालेल्यांच्या संख्येतले अंतर सातत्याने वाढत आहे. सक्रीय रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या 92 लाखाने (92,06,996)जास्त आहे. बरे होण्याचा दरही वाढून 95.40% झाला आहे. जागतिक स्तरावर हा दर सर्वोच्च असलेल्या देशांपैकी भारत एक आहे.

सक्रीय रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची एकूण संख्या 30 पटीने जास्त आहे.भारतात सध्या 3,13,831 सक्रीय रुग्ण असून ते भारताच्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णांच्या केवळ 3.14% आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BEWV.jpg

दैनंदिन नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त असल्याने बरे झालेल्यांच्या एकूण संख्येत वाढ होण्याबरोबरच सक्रीय रुग्णातही घट नोंदवण्यात येत आहे.

गेल्या 24 तासात भारतात 22,890 कोविड बाधितांची नोंद झाली आहे. याच काळात  31,087 रुग्ण कोरोना मुक्त झाले.

गेले 21 दिवस दैनंदिन नव्या रुग्णापेक्षा बरे झालेल्यांची संख्या सातत्याने जास्त आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0021UXM.jpg

 देशात बरे झालेल्या एकूण रुग्णांपैकी सुमारे  52% (51.76%) रुग्ण 5 राज्यातले आहेत.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003WHEL.jpg

नव्याने बरे होणाऱ्या रुग्णांपैकी 75.46% रुग्ण 10 राज्य/ केंद्र शासित प्रदेशात आहेत.

बरे झालेल्यांची एका दिवसातली सर्वाधिक संख्या केरळमध्ये नोंदवली गेली असून इथे एका दिवसात 4,970 रुग्ण बरे झाले. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 4,358 तर पश्चिम बंगाल मध्ये 2,747 रुग्ण बरे झाले.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004T02Y.jpg

नव्या रुग्णांपैकी 76.43% रुग्ण 10 राज्य/ केंद्र शासित प्रदेशात आहेत.

केरळ मध्ये सर्वात जास्त म्हणजे 4,969 दैनंदिन रुग्णांची नोंद झाली पश्चिम बंगाल मध्ये 2,245 आणि छत्तीसगड मध्ये 1,584 नव्या रुग्णांची नोंद झाली.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image005UR9I.jpg

गेल्या 24 तासात 338  मृत्यूंची नोंद झाली.

या पैकी सुमारे 75.15% मृत्यू 10 राज्य / केंद्र शासित प्रदेशातले आहेत.

महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे दैनंदिन (65) मृत्यूंची नोंद झाली. पश्चिम बंगाल मध्ये 44 आणि दिल्लीमध्ये 35 मृत्यूंची नोंद झाली.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0064J7V.jpg

भारतात दैनंदिन मृत्यू संख्येत सातत्याने घट होत आहे. गेल्या 13 दिवसापासून दैनंदिन मृत्यू संख्या 500 पेक्षा कमी नोंदवली गेली आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image007HRXM.jpg


* * *

U.Ujgare/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1681673) Visitor Counter : 276