पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांचे असोचॅम स्थापना सप्ताह-2020 मध्ये 19 डिसेंबर रोजी बीजभाषण

Posted On: 17 DEC 2020 9:47PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे असोचॅम स्थापना सप्ताह 2020 मध्ये 19 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 10.30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बीजभाषण होणार आहे. यावेळी टाटा उद्योग समुहाला असोचॅम एंटरप्राइज ऑफ द सेंच्युरी अॅवॉर्डहा पुरस्कार देण्यात येणार आहे. टाटा समुहाच्यावतीने रतन टाटा यांना पंतप्रधानांच्या हस्ते हा पुरस्कार बहाल करण्यात येणार आहे.

 

असोचॅमविषयी माहिती -

भारतातील सर्व क्षेत्रातल्या चेंबर्सच्या संस्थापक प्रतिनिधींच्या वतीने असोचॅमची स्थापना 1920 मध्ये करण्यात आली. 400 पेक्षा जास्त वेगवेगळ्या चेंबर्स आणि व्यापारी संघटना असोचॅममध्ये सहभागी झाल्या असून संपूर्ण देशभरात 4.5 लाखांपेक्षा जास्त सदस्य आहेत. भारतीय उद्योगांसाठी असोचॅम ज्ञानाचे मुख्य केंद्र म्हणून उदयास आले आहे.

***

S.Thakur/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1681592) Visitor Counter : 73