आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारतात सक्रीय रुग्णांच्या संख्येमध्ये घट जारी,आज 3.32 लाख सक्रीय रुग्ण
गेल्या 17 दिवसांपासून भारतात दररोज 40 हजारपेक्षा कमी रुग्णांची नोंद
गेल्या 11 दिवसात दैनंदिन मृत्यू संख्या 500 पेक्षा कमी
Posted On:
16 DEC 2020 2:48PM by PIB Mumbai
भारतात एकूण सक्रीय रुग्णांच्या संख्येमध्ये घट होण्याचा कल जारी आहे. देशात सक्रीय रुग्ण 3,32,002 असून सक्रीय रुग्णाचे एकूण पॉझिटीव्ह रुग्णामध्ये असलेले प्रमाण आणखी कमी होऊन ते 3.34%झाले आहे.
गेल्या 24 तासात भारतात 26,382 कोविड बाधितांची नोंद झाली आहे. याच काळात 33,813 रुग्ण कोरोना मुक्त झाले.
गेल्या 17 दिवसापासून भारतात दररोज 40 हजारपेक्षा कमी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
दहा लाख लोकसंख्येमागे नव्या रुग्णाची संख्या सर्वात कमी असणाऱ्या, जगातल्या देशांमध्ये भारत गेले सात दिवस आहे (147).
कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या 94.5 लाखाच्या पुढे गेली आहे(9,456,449). रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 95.21%.झाले आहे.
बरे झालेल्यां रुग्णापैकी 76.43% रुग्ण 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातले आहेत.
बरे झालेल्यांची एका दिवसातली सर्वाधिक संख्या केरळमध्ये नोंदवली गेली असून इथे एका दिवसात 5,066 रुग्ण बरे झाले. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 4,395 तर पश्चिम बंगाल मध्ये 2,965 रुग्ण बरे झाले.
नव्या रुग्णांपैकी 75.84% रुग्ण 10 राज्य/ केंद्र शासित प्रदेशात आहेत.
केरळ मध्ये सर्वात जास्त म्हणजे 5,218 दैनंदिन रुग्णांची नोंद झाली असून महाराष्ट्रात 3,442 तर पश्चिम बंगाल मध्ये 2,289 नव्या रुग्णांची नोंद झाली.
गेल्या 24 तासात 387 मृत्यूंची नोंद झाली.
या पैकी सुमारे 75.19% मृत्यू 10 राज्य/ केंद्र शासित प्रदेशातले आहेत.
महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे दैनंदिन 70 मृत्यूंची नोंद झाली. पश्चिम बंगाल मध्ये 45 आणि दिल्लीमध्ये 41 मृत्यूंची नोंद झाली.
भारतात दैनंदिन मृत्यू संख्येत सातत्याने घट होत आहे. गेल्या 11 दिवसात दैनंदिन मृत्यू संख्या 500 पेक्षा कमी नोंदवली गेली आहे.
भारतात गेल्या सात दिवसात दहा लाख लोकसंख्येमागे झालेले मृत्यू (2) हे जगातल्या सर्वात कमी मृत्यू संख्येपैकी आहेत.
U.Ujgare/N.Chitale/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1681029)
Visitor Counter : 181
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam