पंतप्रधान कार्यालय

शेख सबाह अल-हमद अल-सबाह यांची कुवेतच्या पंतप्रधानपदी फेरनिवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले त्यांचे अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 08 DEC 2020 11:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2020

 

 

महामहीम शेख सबाह अल-हमद अल-सबाह यांची कुवेतच्या पंतप्रधानपदी फेरनिवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेख सबाह यांचे अभिनंदन केले आहे.

“कुवेतमध्ये 5 डिसेंबरला झालेल्या राष्ट्रीय लोकसभा निवडणुकीत यशस्वी होऊन कुवेतच्या पंतप्रधानपदी फेरनिवड झाल्याबद्दल महामहीम शेख सबाह अल-हमद अल-सबाह यांचे हार्दिक अभिनंदन!

कुवेतचे अमीर महामहीम शेख नवाफ अल-अहमद अल-जबेर अल-सबाह यांच्या दूरदर्शी नेतृवाखाली भारत आणि कुवेत यांच्यातील उत्तम द्विपक्षीय संबंधांचा विस्तार  अधिकाधिक वाढेल आणि हे संबंध बहरत जातील असा विश्वास मला वाटतो,” अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भावना ट्विट संदेशांद्वारे व्यक्त केल्या आहेत.”

 

 

* * *

U.Ujgare/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1679287) आगंतुक पटल : 115
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam