पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी ‘इन्व्हेस्ट इंडिया’चे केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
08 DEC 2020 9:42AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2020
युएनसीटीएडी अर्थात संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास विषयक परिषदेकडून देण्यात येणारे या वर्षीचे संयुक्त राष्ट्र गुंतवणूक प्रोत्साहन पारितोषिक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘इन्व्हेस्ट इंडिया’ या राष्ट्रीय पातळीवर गुंतवणुकीला प्रोत्साहन आणि सुलभीकरण करण्यासाठी स्थापन केलेल्या संस्थेचे अभिनंदन केले आहे.
“युएनसीटीएडी कडून दरवर्षी दिला जाणारा संयुक्त राष्ट्र गुंतवणूक प्रोत्साहनासाठीचा 2020 या वर्षीचा पुरस्कार मिळविल्याबद्दल मी ‘इन्व्हेस्ट इंडिया’चे अभिनंदन करतो. भारत जागतिक पातळीवर गुंतवणुकीसाठी प्राधान्य मिळणारा देश व्हावा आणि देशात व्यापार करणे अधिक सुलभ व्हावे यासाठी भारत सरकार करीत असलेल्या प्रयत्नांना मिळालेले हे प्रशस्तिपत्रच आहे,” असे पंतप्रधानांनी त्यांच्या ट्विटरसंदेशात म्हटले आहे.
U.Ujgare/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1679032)
आगंतुक पटल : 386
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam